कारखान्यान मधील लगबग….

कारखान्यान मधील लगबग….

कारखान्यान मधील लगबग....

✍राकेश नवले✍
मुंबई शहर प्रतिनिधी
मो नंबर : 8097130040

मुंबई : – गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपला आहे , गणेशभक्तांना ओढ लागली आहे आपल्या बाप्पाला घरी आणण्याची तर मुर्तिकरांना ओढ लागली आहे सगळ्या मुर्त्या वेळच्या वेळेवर तयार करण्याची , मुंबई मधील मोठ मोठया गणेश मंडळांचे अगमन सोहळे जरी उरकले असले तरीसुद्धा काही लहान मोठ्या गणेश मंडळांच्या गणेश मुर्त्या अजूनही तयार करण्याच्या लगबगीत मूर्तिकार पहावयास मिळतात , अशीच काहीशी लगबग आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे
करी-रोड येथील गण-संकुल च्या कार्यशाळेत मूर्तीवरील दायमंडवर्क, देटेलिंग तसेच रंगकाम करताना कारागीर मोठ्या संख्येने पहेवयास मिळतात , मूर्तीवरील बारकाई व सुशोभीकरणासाठी लावलेला मोराचा पिसारा असेल किंवा घातलेला फेटा असेल हे पाहणाऱ्याच्या हृदयात नक्कीच एक न विसरणारी जागा करून जात असतो अशीच काही मन मोहित करणारी दृष्य आम्ही आपल्यासाठी टिपली आहेत .