ग्रामपंचायत सदस्यांचे सामूहिक राजीनामे रामपूरच्या सरपंच्या गौरकार यांची मनमानी

ग्रामपंचायत सदस्यांचे सामूहिक राजीनामे

रामपूरच्या सरपंच्या गौरकार यांची मनमानी

ग्रामपंचायत सदस्यांचे सामूहिक राजीनामे रामपूरच्या सरपंच्या गौरकार यांची मनमानी

खुशाल सूर्यवंशी
राजुरा तालुखा प्रतिनीधी
8378848427

राजुरा तालुक्यातील प्रतिष्ठित ग्रामपंचायत रामपूर येथील 5 सदस्यांनी सामूहिक राजीनामे एकत्र दिले असून, सरपंच सौ गौरकार हे आपल्या पदाचा वापर करून मनमानी कारभार करत असून वयक्तिक प्रभागातील कामाकडे दुर्लक्ष होत आहे.
वॉर्ड क्र 3 आणि 4 मध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून एक काम सुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत नसून सदस्यांना वॉर्डात फिरत असताना जनता प्रश्न विचारत आहे. अश्या परिस्थितीत सरपंच म्हणून प्रशासन ऐकत नाही आणि परिस्थितीचा फायदा घेऊन सरपंच्याचे पती आपला मनमानी कारभार चालवतात. या सर्व बाबींमुळे सदस्यांना कोणताही निर्णय स्वतंत्रपणे घेता येत नाही. म्हणून ग्रामपंचायत सदस्य रमेश झाडे, संगीता विधाते, लता डखरे,अनिता आळे आणि लक्ष्मी चौधरी यांनी आपला सामूहिक राजीनामा बी डी ओ पंचायत समिती यांच्याकडे पाठवला आहे. म्हणून हे प्रकरण लोकशाहीसाठी अतिशय घातक असून जनतेचे सेवक म्हणून आपण जर काहीच करत नसू तर पदावर राहून काय फायदा या दृष्टिकोनातून हा निर्णय सदस्यांनी घेतला. पुढे याविषयी काय कार्यवाही होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.