वेकोलीच्या लालपेठ खुल्या कोळसा खाणीत युवकाची आत्महत्या
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर, 31 ऑगस्ट
वेकोलीच्या लालपेठ खुल्या खाणीत अज्ञात युवकाने साचलेल्या पाण्यात उडी घेतली आहे अशी चर्चा सुरू झाल्यावर वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना त्याठिकाणी जावं लागलं. 31 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास एका युवकाने खुल्या खाणीत प्रवेश करीत पाण्यात उडी घेतली अशी चर्चा सुरू होती, त्या चर्चेवर वेकोलीचे अधिकारी व जिल्हा प्रशासनातील बचाव पथकाने पोहचत शोधकार्य सुरू केले असता एका युवकाचा मृतदेह त्याठिकाणी बचाव पथकाला मिळाला. सदर मृतक युवकाचे नाव यश साखरकर असून तो विठ्ठल मंदिर वार्ड येथील रहिवासी असल्याची ओळख पटली. त्याने वेकोलीच्या लालपेठ खाणीमध्ये प्रवेश करीत साचलेल्या पाण्यात उडी घेत आत्महत्या केली. विशेष बाब म्हणजे वेकोली खाण क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, वेकोली कर्मचाऱ्यांशीवाय त्याठिकाणी कुणीही प्रवेश करू शकत नाही. आत्महत्येमागील कारण सध्या अस्पष्ट असले तरी तो नजर चुकवीत प्रतिबंधित क्षेत्रात पोहचलाच कसा यावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वेकोलीच्या ढिसाळ सुरक्षा नियोजनामुळे बाहेरील युवक त्याठिकाणी दाखल होत आत्महत्या करतो ही वेकोलीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब आहे. वेकोली व्यवस्थापन कर्तव्यावर हजर असलेल्या सुरक्षारक्षकांवर काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.