किशोर नरुले, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने होणार सन्मानित
कर्मवीर विद्यालय नागभिडच्या शिरपेचात मानाचा तुरा
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड —-कर्मवीर विद्यालय नागभीड येथील किशोर नीलकंठराव नरुले सर यांना यंदाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ज्ञानज्योती बहुदेशिय संस्था श्रीरामपुर, जि.अहमदनगर द्वारा जाहीर करण्यात आलेला आहे. सदर संस्थेद्वारे महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निवडक शिक्षकांची निवड करून दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर
पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, ५००१ रू रोख, प्रमाणपत्र, शिल्ड या रूपाने असून कोरोनाकाळात विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनिय कामगिरी, स्कालरशिप वर्ग, विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम, गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न यासाठी दिला जात असून, पद्मश्री राईबाई पोपरे यांच्या हस्ते
सन्मा. दिनकरराव टेमकर शिक्षण संचालक पुणे, दिनेशजी लंके आमदार पारनेर विधानसभा यांचे उपस्थितीत पार पडणार आहे.
सदर पुरस्काराबाबत कर्मवीर विद्यालयाचे प्राचार्य मा. देविदासजी चिलबुले सर तथा सर्व शिक्षकवृंद, इतरही मित्र मंडळी आदींनी अभिनंदन केले आहे.