अहेरी उप- जिल्हा सीरोंचा तालुक्यात चिमुकल्यांची बाप्पाप्रती अनोखी श्रद्धा! - झोपडीत साकारले पर्यावरणपूरक बाप्पा - अखंडित सकाळ, सायंकाळ पुजाअर्चना

अहेरी उप- जिल्हा सीरोंचा तालुक्यात
चिमुकल्यांची बाप्पाप्रती अनोखी श्रद्धा!
– झोपडीत साकारले पर्यावरणपूरक बाप्पा
– अखंडित सकाळ, सायंकाळ पुजाअर्चना

अहेरी उप- जिल्हा सीरोंचा तालुक्यात चिमुकल्यांची बाप्पाप्रती अनोखी श्रद्धा! - झोपडीत साकारले पर्यावरणपूरक बाप्पा - अखंडित सकाळ, सायंकाळ पुजाअर्चना

अमितकुमार त्रिपटी
अहेरी उप-जिल्हा प्रतिनिधी
मोबाइल 9422891616

सिरोंचा
गणेशोत्सवात भाविक रोशनाई, झाकी, विशाल मंडप उभारुन साजश्रृंगार चढवून गणरायाप्रती श्रद्धा व्यक्त करतात. याकरिता लाखो रुपयांची उधळण केली जाते. मात्र देवाप्रती केवळ मनोभावे श्रद्धा असली तरी भक्तांची भावना आपसूकच देवापर्यंत पोहचत असतात. असाच प्रकार सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 35 किमी अंतरावर असलेल्या टेकडाताला या दुर्गम गावात प्रत्ययास आला आहे. येथील चिमुकल्यांनी लाडक्या बाप्पाप्रती निस्सीम श्रद्धा व्यक्त करीत लहानशा झोपडीत पर्यावरणपूरक गणरायाची प्रतिष्ठापना केली. झाडांच्या पानांने रचलेल्या झोपडीवजा मंडपात स्थापित झालेल्या गणरायाची सदर बालके नित्यनेमाने अखंडित पुजाअर्चना करीत गणरायाप्रती श्रद्धा व्यक्त करीत आहेत. या निरागस बालकांची ही भक्ती बघून ग्रामस्थांकडून स्तुतिसुमने उधळली जात आहेत.

बारीक काडया व ताड़ी च्या पानाने साकारले बाप्पाचे मंदिर
टेकडाताला या गावातील या चिमुकल्यांनी गणरायाची स्थापना करण्यासाठी कुणाचीही मदत घेतलेली नाही. बालकांना स्वत:हून पुढाकार घेत झाडांची पाने गोळा करुन झोपडीवजा मंडप साकारले. या मंडपात मातीच्या मुर्तीची स्थापना करण्यासाठी मंदिराची निर्मिती करीत चहूबाजूने पानांची पताका लावून सजावट करण्यात आली. या झोपडीवजा मंदिरातून बालकांनी प्रदुषण मुक्तीचा अनोखा संदेश देत गणरायाप्रती अनोखी श्रद्धा व्यक्त केली.
कृतीतून निरागसांनी दिला समाजाला संदेश
लाडक्या श्रीगणेशाची आगमनाची पूर्ण तयारी करीत मोठ्या भक्तीभावाने या निरागस बालकांना बाप्पाची प्रतिष्ठापना केली. तसेच नित्यनेमाने भक्तीभावाने श्रीगणरायाची पुजाअर्चना बालकांद्वारे केली जात आहे. एरव्ही झगमगाट, ।तामझामीतून उदात्तीकरण केले जात असतांना टेकडाताला येथील चिमुकल्याने अनोख्या पद्धतीने गणरायाप्रती श्रद्धा व्यक्त करीत भक्तीचा अनोखा संदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here