पाण्यासाठी शेकापक्ष आक्रमक: ऐन गणपतीत २१ गावे पाण्यापासून वंचित पाणी न दिल्यास उग्र आंदोलनाचा इशाराच

51

पाण्यासाठी शेकापक्ष आक्रमक: ऐन गणपतीत २१ गावे पाण्यापासून वंचित
पाणी न दिल्यास उग्र आंदोलनाचा इशाराच

पाण्यासाठी शेकापक्ष आक्रमक: ऐन गणपतीत २१ गावे पाण्यापासून वंचित पाणी न दिल्यास उग्र आंदोलनाचा इशाराच

शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:02/09/2022

रोहा: हर घर जल चा नारा देशभरात दिला जात आसताना अलिबाग तालुक्यातील तब्बल २१ गावे ऐन गणेशोत्सवात पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. या गावांना तात्काल पाणी पुरवठा सुरु करण्या च्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ( एम आय डी सी )कार्यालयात धरक दिली.
शेकापक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संजय पाटील, शेकापक्ष महिला आघाडी प्रमुख श्रीम.चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस श्री.आनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यावेळी पाण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत तात्काळ पाणी उपलब्ध करून दिले नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराच या वेळी दिला.
अलिबाग तालुक्यातील चेंढरे,वेशवी,कुरुळ,बेलकडे,आक्षी, ढवर,कावीर,बामणगाव,खानाव,या दहा ग्रामपंचायत हद्दीतील २१ गावाना एम आय डी सी मार्फत पाणी पुरवठा केला जातो,मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्या मुळे या गावातील हजारो ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.एमआयडीसी च्या
अधिकाऱ्यांकडे या बाबत शेकाप तसेच संबंधित ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार मागणी करुन देखील पाणी पुरवठ्या बाबत एमआयडीसी अकार्यक्षम ठरत आहे.
३१ ऑगस्त पासुन गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर ही गावांना पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट झाला.
आपल्या संतप्त भावना ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी शेकापक्ष चे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संजय पाटील,शेकाप महिला आघाडी प्रमुख श्रीम.चित्रलेखा पाटील,तालुका चिटणीस श्री.अनिल पाटील,यांच्या कानावर घालताच तात्काल पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी शिष्टमंडळाने एमआयडीसी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांकडे मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी शिष्टमंडळाने एमआयडीसी चे कार्यकारी अभियंता श्री.संजय ननवरे यांच्याकडे पूर्वनियोजित वेळेनुसार भेट घेत पाण्याची समस्या कानावर घातली.मात्र अभियंता यांनी समस्या समजावून घेण्याऐवजी शिष्टमंडळाच सदर पाणी गेल कंपनीचे आसल्याचे उद्दामपणे सांगीतले.
हे उत्तर ऐकताच शेकाप चे शिष्टमंडळ संतप्त होत आक्रमक झाले.अभियंता ननवरे यांची चांगलीच कान उघाडणी करीत त्यांना चांगल्या शब्दात समज देण्यात आली,त्यावर आपली चुक लक्षात येताच अभियंता ननवरे यांनी शेकाप शिष्टमंडळासमोर दिलगीरी व्यक्त करीत नमते घेत तात्काल आडचणी दुर करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आसल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. मात्र सदर पाणी आमच्या हक्काचे आसुन जर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तर शेकापक्षा च्या वतीने उग्र आंदोलन करण्या चा इशाराच या वेळी देण्यात आला.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील,तालुका चिटणीस अनिल पाटील,यांच्यासह बेलकडे सरपंच संजय पाटील,कुरुळ च्या उप सरपंच स्वाती पाटील,अवधूत पाटील,नरेश चवरकर,बामणगाव उप सरपंच लंकेश नागावकर,महेंद्र पाटील,रुपेश पाटील आदी उपस्थित होते.
“हर घर जल”च्या नाऱ्याला हरताळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर जल चा नारा देत संपुर्ण देशात प्रत्येक घराघरात पाणी पुरविण्याची घोषणा करून या आभियानाची देशव्यापी मोहिम सुरु केली आहे.
मात्र अलिबाग तालुक्यातील एमआयडीसी मार्फत हजारो घरांमध्ये पाणी पुरवले जात नसल्याने घरात पाण्याचा थेंब नाही. त्या मुळे ऐन सणासुदित विकत पाणी आणण्याची वेळ ओढवली आहे. त्या मुळे पंतप्रधानाच्या हर घर जल या नाऱ्याला अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे हरताल फासला जात आसल्याचे निदर्शनास आले.