निमगाव येथील रक्तदान शिबिरात 30 रक्तदात्यांनी केले रक्तदान*
“युवा बाल गणेश मंडळ निमगाव चा उपक्रम”
बाबा मेश्राम
सावली तालुका प्रतिनिधी
7263907273
सावली : – युवकांनी स्वयंस्फूर्तीने समोर येऊन रक्तदान करावे, आपल्या रक्तदानाने एखाद्या रुग्णाचा जीवन वाचवू शकतो, त्यामुळे रक्तदान करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन युवा बाल गणेश मंडळाचे पुनम झाडे यांनी केले, निमगाव येथील युवा बाल गणेश मंडळ व सामान्य रुग्णालय रक्तपेढी गडचिरोलीच्या वतीने पुनमभाऊ झाडे यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबीराचे आयोजन गुरूदेव प्रार्थना मंदिरात करण्यात आले होते, या शिबिरात 30 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सहकार्य केले.
प्रत्येक युवकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे, गावातील युवक रक्तदानासाठी प्रेरित व्हावे या उद्देशाने युवा बाल गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ,यात 30 रक्तदात्यांनी रक्तदान करून या पुढेही रक्तदान करण्याचा संकल्प केला
या रक्तदान शिबिराकरिता रक्त संक्रमण केंद्र सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील डॉ. प्रणाली खोब्रागडे, पंकज निखाडे, वसंत नान्हे, बंडू कुंभारे, प्रतीक्षा कांटेगे, ऋचा निमगडे हे उपस्थित राहून शिबीर संपन्न केले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी युवा बाल गणेश मंडळाचे कार्यकर्ते मनोज झाडे आशिष जुनघरे, रोशन कन्नाके, मोहन देशमुख, राजु यम्पलवार गजानन करपाते, रोशन झाडे, प्रशांत राऊत, संतोष भोयर, काशिनाथ मोहुर्ले, किशोर खेडेकर,हिवराज झाडे, रोशन चालीगांजेवार, सुधीर गुरुनुले, अमोल बुद्धेवार, संतोष चिमुरकर, संदीप झाडे,अमोल भोयर प्रकाश पेंदाम आदींनी सहकार्य केले.