रेल्वे प्रशासनाचे रोहा-चिपळूण मेमु बाबत खोटारडे पणा-प्रकाश विचारे

48

रेल्वे प्रशासनाचे रोहा-चिपळूण मेमु बाबत खोटारडे पणा-प्रकाश विचारे

रेल्वे प्रशासनाचे रोहा-चिपळूण मेमु बाबत खोटारडे पणा-प्रकाश विचारे

शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.७९७२४२०५०२
दि:०७/०९/२०२२

रोहा: मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा गाजावाजा करित गणपती पुर्वी अपडाउन मार्गावर प्रवाश्यांच्या सोई साठी रोहा चिपळूण मेमु चालविली जाइल आसे वृत्त प्रसार माध्यमांना दिले आर्थात तेव्हा देखील मुंबई,नवी मुंबई ठाण्याचे चिपळूण पर्यंत जाणारे प्रवाशी रोह्या पर्यंत कसे पोहचणार हा प्रश्न आवासुन उभा राहिलाच होता.पण मध्य रेल्वे प्रशासनाने पुढे चालाखी करुन तसेच रोह्या पर्यंत च्या प्रवाश्यांवर अन्याय करुन रोहा रेल्वे स्थानक कार्यरत झाल्या पासून सुरु असणारी दिवा ते रोहा हिच गाडी चिपळूण पर्यंत वाढविण्यात येवुन सोई ऐवजी गैर सोयच प्रवाश्यांच्या पदरी टाकली.
तसेच दिवा ते चिपळूण या प्रवासास किमान सहा तास लागतात.परिणामी या मेमुतील प्रवाश्यांच्या नैसर्गिक गरजांचा म्हणजेच टॉयलेट वगैरे चा विचार करण्यात न आल्याने विशेष महिला व मधुमेही प्रवाश्यांवर महा-अन्याय करुन आपला बिनडोक पणा पण रेल्वे प्रशासनाने सिध्द केला आहे. हि चिपळूण ते दिवा मेमु चार ते पाच अमदार व दोन खासदार यांच्या मतदार संघातून जाते परंतु एकाही लोक प्रतिनिधींनी या अन्याया बाबत आवाज उठविल्याचे ऐकीवात नाही.
आवेरीस दि:०५/०९/२०२२,रोजी नवीन पनवेल येथील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.प्रकाश विचारे यांनी रोहा रेल्वे स्टेशनवर कैफियत क्र:१८२५९५ पुढे तरी रेल्वे प्रशासन जागृत राहील व प्रवाशी देखील सतर्क रहातील या उद्देशाने तक्रार गुदरली आसल्याचे ते म्हणाले.