पाचोर्यात भावी इंजीनियर पोलीस बॉय चे दुदैवी निधन

57

पाचोर्यात भावी इंजीनियर पोलीस बॉय चे दुदैवी निधन

पाचोर्यात भावी इंजीनियर पोलीस बॉय चे दुदैवी निधन

मीडिया वार्ता न्यूज
पाचोरा तालुका प्रतिनिधि
ईसा तडवी
मो.9860884602

पाचोरा – येथील पोलीस लाईन मधील १९ वर्षीय भावी इंजीनियर चा इलेक्ट्रिक शॉक ने दुदैवी मृत्यू झाला असून गणेश मंडळासह पोलीस परीवारावर दुःखाचे सावट आले आहे. या तरुणांची उद्या अंत्ययात्रा होणार आहे.
पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे यांचा सारथी ए एस आय अशोक महाजन यांचा एकलुता एक मुलगा आदीत्य अशोक महाजन (१९) हा पाणी भरण्यासाठी आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास इलेक्ट्रीक मोटर ची पिन काढायला गेला असता त्याचे इलेक्ट्रिक शॉक लागुन निधन झाले. आदीत्य हा इंजिनिअरिंग चे शिक्षण नांदेड येथे घेत होता. पोलीस लाईन मध्ये सालाबाद प्रमाणे गणेश स्थापना पोलीस बॉईज करत असतात यासाठी आदीत्य आला होता. त्याच्या दुदैवी जाण्याणे शहरात शोककळा पसरली अशोक महाजन यांना एक मुलगा एक मुलगी आहे. आदीत्य ची अंत्ययात्रा उद्या दि. ८ रोजी पोलीस लाईन येथुन सकाळी ११ वाजता निघणार आहे.