ट्रकची दुचाकीला जबर धडक, पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी.

72

ट्रकची दुचाकीला जबर धडक, पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी.

ट्रकची दुचाकीला जबर धडक, पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी.

✍तारा आत्राम✍
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
95116 20282

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,चंद्रपूर घुग्गुस मार्गावरील धानोरा फाट्याजवळ भीषण अपघात.
चंद्रपूर –
आज दुपारी १. ३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर-घुग्घुस मार्गावरील धानोरा फाट्यावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. मृताचे नाव सपन संतोष गाईन (४०) तर मंजू गाईन असे जखमी महिलेचे नाव आहे. हे दाम्पत्य श्याम नगर चंद्रपूरचे रहिवासी आहे.

गाईन दाम्पत्य दुचाकी क्रमांक एमएच ३४ एझेड १०८६ ने धानोरा गावाकडे जात होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्र. टीएन ३७ डीएक्स ८१७६ ने जबर धडक दिली. त्यात संतोष गाईन यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी मंजू गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पुलिस घटना स्टडी पोहचून दवाखान्यात एडमिट करना आले आहे.