गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! जड अंत :कारणाने बाप्पाला निरोप

51

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! जड अंत :कारणाने बाप्पाला निरोप

✍सचिन पवार ✍

रायगड ब्युरो चीफ

📞8080092301📞

 

माणगांव :-गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, अशा जयगोषात वाजत गाजत आज राज्यभरात लाडक्या ‘बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. दहा दिवस मनोभावे पुजा केल्या नंतर आज सर्वत्रच बाप्पाला निरोप दिला दिला जातोय माणगांवसह राज्यभरात बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत जल्लोष सुरु झाला आहे. ढोल ताशाचा गजर तर कुठे डी जे तर कुठे खालूबाजा ह्यावर बेभान होऊन नाचणारे भक्त गुलालाची उधळण बाप्पावर ठीक ठिकाणी होणारी पुष्पवृष्टी आणि फटाक्याची आतिषबाजी आज माणगांव तालुक्यात पाहायला मिळत होती.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! जड अंत :कारणाने बाप्पाला निरोप

अनंत चतुदशी म्हणजेज विसर्जनासाठी प्रशासनानी जय्यत तयारी केलेली पाहायला मिळत होती माणगांव शहरात काळ नदी या प्रमुख स्थलावर नगर पचायत चे कर्मचारी व माणगांव नगर पंचायत चे नगरअध्यक्ष श्री ज्ञानदेव पवार याच्यासह माणगांव उपविभागीय अधिकारी पोलीस प्रवीण पाटील,पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पी. एस.आय. अनंत पवार, पो कॉ सुरवसे, संतोष सुग्रे, प्रशांत पाटील, भरत तांदळे, महिला पोलीस जाधव महिला पो किरपण, माणगांव ट्रॅफिक पोलीस त्याच प्रमाणे सुरक्षा बल रक्षक (होमगार्ड ) बाप्पा च्या मिरवणुकीत सामील झाले होते.

३१ ऑगस्ट रोजी लाडक्या गणपती बाप्पाच आगमन झालं होत. त्याआधी पंधरा दिवसापासून उत्सहाच्या तयारीची लगबग सुरु झाली होती या सजावटीच्या साहित्याची असंख्य प्रकारणी बाजारपेठ सजल्या होत्या गल्ली बोलात गणरायच्या रेखीव आणि लोभसं मूर्तीचे स्टॉल आले आणि उत्सावाची लगबग वाढत गेली.३१ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पा मोरया या जल्लोशात नव्या उत्सहात गणेश भक्ताची सुखकर्ता, विघ्नहर्ता, बाप्पाचे घराघरात मंडळामध्ये वाजत गाजत आगमन झाले त्यानंतर दहा दिवस गणपती बाप्पा ची मनोभावे पूजा करण्यात आली. माणगांव, रायगड, मुंबई तसेच राज्यभर भाविकांनी गणपती ची मूर्ती देखावे बघण्यासाठी गर्दी केली होती ठीक ठिकाणी सुरु असलेले सास्कृतिक कार्यक्रम स्रोतपटन गणेशवंदना पारपारिक वाद्याच्या मिरवणूका धार्मिक कार्यक्रमामुळे दहा दिवस वातावरण गणेशमय झाले होते. बघता बघता आज गणेशोत्सवाच्या शेवटचा दिवस निरोप देण्यासाठी गणेशभक्त रस्त्यावर उतरले आहेत. पुढच्या वर्षी देखील पुन्हा नव चैतन्य घेऊन या असे आव्हाहन करीत भाविक बाप्पाला निरोप देत होते.

गणपती विसर्जनासाठी तब्बल दोन ते तीन किमी चा प्रवास वेगळ्या वेगळ्या दिशेने माणगांव कर करत होते. माघील दोन वर्ष कोरोना मुळे कोणतेही सण उत्सहात पाहायला मिळाले नाही तसेच जल्लोष करायला मिळालेला नाही या अनुषंगाने माणगांवकर ढोल ताश्याचा गजरात डी जे च्या गजरात व खालू बाजा वर ठेका धरून नाचत होते. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला असे बोल प्रत्येक भक्तामध्ये पाहायला मिळत होते.