नागोठणे भिसेखिंडीत ट्रक व दुचाकीचा जबर आपघात,कोळश्याने  ओवरलोड ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीस्वार जागीच ठार,विना लायसन्स च्या चालकांवर पोलीसांचे दुर्लक्ष 

56

नागोठणे भिसेखिंडीत ट्रक व दुचाकीचा जबर आपघात,कोळश्याने 

ओवरलोड ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीस्वार जागीच ठार,विना लायसन्स च्या चालकांवर पोलीसांचे दुर्लक्ष 

शहानवाज मुकादम 

रोहा शहर प्रतिनिधी

मो.7972420502

नागोठणे भिसेखिंडीत ट्रक व दुचाकीचा जबर आपघात,कोळश्याने 
ओवरलोड ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीस्वार जागीच ठार,विना लायसन्स च्या चालकांवर पोलीसांचे दुर्लक्ष

 

दि:11/09/2022

रोहा: आज नागोठणे भिसेखिंडीत वाकण फाट्या जवळ दुपारी वेळ ०३ वा,च्या सुमारास ट्रक व दुचाकी चा जबर आपघात झाला.

पाली हुन रोहा कडे जात आसताना दुचाकी क्र:MH.BC.7231 ला रोहा करुन येणारा MH.13.2987 चा ओवरलोड ट्रक चालकाचा ताबा सुटला आसुन दुचाकीस्वारला घसपटत खिंडीतून खाली गेल्याने दुचाकीस्वार चा जागीच मृत्यु झाला.

सदर आपघाता बाबत नागोठणा पोलीस बिटमार्शल यांना कळताच घटनास्थळी धाव घेऊन ट्रक खाली आडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात चे पर्यत्न सुरु केले.तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सूर्यवंशी,नागोठणा पोलीस निरीक्षक श्री जगताप,ट्रॉफीक पोलीस निरीक्षक श्रीम पत्की मेडम,पोलीस हवालदार माळी,शिर्के,पोलीस सिपाही राहुल पाटील,रामनाथ ठाकूर सह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आसुन रेस्क्यू ऑपरेशन करून कोळश्या ने ओवरलोड आसलेल्या ट्रक खालुन मृतदेह बाहेर काढून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविण्यात आले.

मृत्यु व्यक्तीचे नाव धर्मा नारायण शिगवण वय सुमारे ६५ वर्ष आसुन रा.चांडगाव ता.रोहा चा आसुन ट्रक चालक व किलनर सदर आपघात सुखरूप बचावले आसुन चालका च्या हाताला दुखापत आसलेने अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. संतप्त जमाव ने ट्रक मालक संतोष मांडरे यांना विचार ना केली की ट्रक चालक याचे कडे लायसन्स आसल्याची खात्री नकरता आपल्या ट्रक वर विना लायसन्स चा चालक ठेवला का? रोह्या ची जेटी बंद आसताना कोळसा कुठून आणला तसेच ट्रक चालक हा नशेत आसल्याचे दिसुनआले, चालका कडे लायसन्स नसल्याने व चालक नशेत आसल्याने ट्रक मालक व चालक यांच्या बेजबाबदारी मुळे एका माणसाचा बळी गेला आसुन पोलीसांचा ही धाक राहीला नसल्याचे दिसुन येते आहे.