माणगांव दिघी महामार्गवर मोटारसायकल व ट्रक चा अपघात बाईकस्वार ठार

✍️सचिन पवार ✍️
रायगड ब्युरो चीफ
📞8080093301📞
माणगांव :-माणगांव दिघी महामार्ग जवळ माणगांव गावच्या हद्दीत 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वा च्या सुमारास मौजे माणगांव गावच्या हद्दीत मोर्बा रोडवर द्वारका हॉटेल च्या पुढे अंधरामध्ये उभा असलेल्या ट्रक ला पाठीमागुन दुचाकीस्वारांनी जोरदार अशी धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.या अपघातात राजु रमेश दिवेकर वय वर्ष 38 या इसमाला डोक्याला लहान मोठया स्वरूपाचा दुखापती झाल्याने अपघातात राजु दिवेकर हा मयत झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की आरोपी याने त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम एच 12 आर एन 9572 हा रहदारीस अडथळा होईल असे धोकादायक रित्या ट्रक लावून उभा होता यातील मयत याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल हिरोहोंडा पॅशन प्रो क्र एम एच 06 बी सी 3561 ने रिले ते माणगांव असा दिघी पोर्ट ते माणगांव महामार्ग ने चालवीत असताना सदर मोटारसायकलची ट्रकला पाठीमागून ठोकर लागून हा अपघात झाल्याची घटना घडली आहे. कॉ गु रजि नं 260/2022 भा द वि कलम 304, अ 337,338,283 प्रमाणे गुन्हा दाखल करून ट्रक चालक किरण नरसिंग जगताप वय 44 रा आंबळे राजेंवाडी ता पुरंदर जि पुणे याला माणगांव पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास स पो नि श्री. लहागे पो ना खिरीट हे करीत आहेत.