गुरे चोरट्यांचा पाठलाग,तब्बल चार तास भयानक थर्रारनाट्य, अखेर चोरट्यांचा चकवा,नागोठणे, रोहा,रेवदंडा पोलीसांची रात्रीस मोहीम 

50

गुरे चोरट्यांचा पाठलाग,तब्बल चार तास भयानक थर्रारनाट्य,

अखेर चोरट्यांचा चकवा,नागोठणे,

रोहा,रेवदंडा पोलीसांची रात्रीस मोहीम 

गुरे चोरट्यांचा पाठलाग,तब्बल चार तास भयानक थर्रारनाट्य,
अखेर चोरट्यांचा चकवा,नागोठणे,
रोहा,रेवदंडा पोलीसांची रात्रीस मोहीम 

शहानवाज मुकादम 

रोहा शहर प्रतिनिधी

मो.7972420502

दि:14/09/2022

 

रोहा: तब्बल चार तास थर्रारनाट्य,

रोहा रेवदंडा अलिबाग पुन्हा अलिबाग ते रोहा असा घुमजाव,तीन पोलीस ठाणे, वीस पंचवीस पोलीसांचा मोहीमेत सहभाग,गुरे चोरट्यांचा पाठलाग सर्वच धक्कादायक प्रसंग मंगळवारी रात्रीच्या चर्चेत आला. गुरे चोरट्यांचा पाठलाग, तब्बल चार तास भयानक थर्रारनाट्याने पोलीस प्रशासनाचीही अक्षरश: झोप उडाली. उप विभागीय पोलीस अधिकारी जिल्हागस्त घालत आसताना भिसेखिंड हद्दीत सफेद रंगाची टाटा पिकअप गाडी संशयास्पद दिसुन आली. एम एच ४८ टी ३१५८ गाडीवरील इसमांकडे गुरे चोरीचे साहित्य होते.गाडीत जबरीने गुरे भरत होते.गाडी जवळ जाताच गाडीबाहेर असलेल्या सहा इसमांनी गळ्यात रस्सीचे फास अडविलेल्या गायी तिथेच सोडून पिकअप वेगाने पळवत सुटले आणि त्यांच्यामागे पाठलाग करण्याचा थर्रारनाट्य रात्री ११.३० वाजता सुरु झाला. तो थर्रारनाट्य रात्री उशिरा ०३.३० पर्यंत चालु होता.

पोलीस पाठलाग करत असल्याचे दिसताच पिकअप गाडी वेगाने रोहा कडे निघाली.तिचा पाठलाग उप विभागीय अधिकारी श्री किरण कुमार सुर्यवंशी व सहकार्याने सुरु केला. निडी सानेगांव चे हद्दीत रात्री उशीरा पिकअप गाडी च्या चालकाने व त्यातील इसमाने संगमत करुन गाडी पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा दोन तीन वेळा प्रयत्न केला,गाडी रिव्हर्स घेउन सरकारी वहानांना जोराने धरक मारुन वाहनाचे नुकसान केले.चोरट्याना अडविण्याकरीता लावण्यात अलेल्या नाकाबंदीतील अधिकारी व अंमलदार यांचे अंगावर पिकअप गाडी घालण्याचाही पर्यत्न झाला.शासकीय कामात अडथळा करुन,बॅरिगेट उडवून चोरटे अलिबाग दिशेला निघाले.नागोठणे रोहा रेवदंडा सर्वच ठिकाणच्या पोलीसांनी चोरट्यांचा पुन्हा पाठलाग सुरु केला.अलिबाग हद्दीतुन पुन्हा उलटा प्रवास करीत पिकअप मध्ये ठेवलेल्या दगडांचा मारा करून चोरटे पिकअप गाडीसह पुन्हा पळुन सानेगांव फाटा येथे आले. जेसीबी रस्त्यावर आडवा अल्याने व रस्ता क्रॉस करण्या साठी जागा नसल्याने पिकअप सोडून सर्व चोरट्यांनी पोलीसांना चकवा देत,पावसाचा व अंधाराचा फायदा घेऊन जंगलभागात अदृश्य झाल्याची थर्रारक घटना घडली.

उप विभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सुर्यवंशी यांनी प्रारंभी प्रचंड धाडस दाखविले,त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.त्यांच्या मदतीला रोह्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर,रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास मुफडे,नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन जगताप व पोलीस अधिकारी मोहिमेत सहभागी झाले होते.चोरटे सोडून गेलेल्या पिकअप गाडी इंजेक्शन,रस्सी, काठ्या,दगडी आदी हिंसक साहित्य मिळाले.गुरे चोरी फरार आरोपी विरुधात भादवी कलम ३०७,३५३,३९३,४२७,२७९,३४सह सार्व.संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधि.१९४८ चे कलम ३ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान,गुरे चोरट्यांचा पाठलाग थर्रारनाट्य तब्बल चार तास सुरु होता.आता फरार चोरट्यांच्या मुसक्या केव्हा आवळल्या जातात?

हे समोर येणार आहे.