माणगांव तालुक्यातील भिरा आदिवासीवाडी येथे ७१,९०० रुपयाची चोरी,चोर फरार

59

माणगांव तालुक्यातील भिरा आदिवासीवाडी येथे ७१,९०० रुपयाची चोरी,चोर फरार

माणगांव तालुक्यातील भिरा आदिवासीवाडी येथे ७१,९०० रुपयाची चोरी,चोर फरार

सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :- माणगांव तालुक्यातील भिरा पाठणूस गावातील मौजे भिरा आदिवासीवाडी येथे दि.११ सप्टेंबर रात्री ८ वाजल्यापासून ते दि.१२ सप्टेंबर सकाळी ६ वा. च्या सुमारास फिर्यादी जाणू लक्ष्मण पवार वय वर्ष ४२ व्यवसाय हॉटेल रा भिरा आदिवासीवाडी ता. माणगांव याच्या घरातून संशयीत आरोपी यांनी स्वतः च्या फायद्या करिता लबाडीच्या हेतूने घराचा दरवाजा उघडा असताना फिर्यादी मालिकीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की फिर्यादी जानू लक्ष्मण पवार याच्या राहत्या घरातून एक सोन्याचे गंथन तीन ग्राम वजनाचे किमत १५ हजार,एक सोन्याचा नेकलेस वजन ६ ग्राम किंमत २०.७०० रु., एक सोन्याचा कानातील जोड वजन ३ ग्राम किंमत १५,२०० रुपये, बारा सोन्याचे मनी वजन एक ग्राम किंमत ५००० रुपये, आणि रोख रक्कम १६, हजार एकूण ७१,९०० रुपये चोरी केले असे सविस्तर वृत्त सांगण्यात येत आहे.संशयित आरोपी याच्या विरोधात माणगांव पोलीस कॉ. गु. रजि. नं.२६९/२०२२ भा. द. वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगांव पोलीस स्टेशनं चे पोलीस निरीक्षक राजेद्र पाटील याच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.तोरवे, पो.ना.खिरीट हे पुढील तपास करीत आहेत.