माणगांव तालुक्यातील भादाव गावातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण
✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-माणगांवमध्ये एका अल्पवयीनं मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना 12 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की माणगांव नगरपंचायत हद्दीतील मौजे भादाव येते एका अज्ञात आरोपीने भादाव गावामध्ये राहणारे जयदेव गायप्रसाद श्रीवास्तव याची अल्पवयीन मुलगी बुलबुल जयदेव श्रीवास्तव वय वर्ष 14 हिच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन एका अज्ञात इसमानी फूस लावून पळवून नेले आहे.
अपहरण मुलीचे वर्णन वय वर्ष 14 उंची 4 फूट, रंग गोरा अंगाने सडपातळ अंगात सफेद रगांचा टीशर्ट काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट कानात टॉप गळ्यात काळा दोरा नाकात सोन्याची चमकी डाव्या हाताच्या अगंट्यावर गोदलेले ओम पायामध्ये चॉकलेटी रंगाची चपल असे आहे. माणगांव पोलीस ठाणे येथे एका अज्ञात इसम विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील याच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लहागे हे करीत आहेत.