श्रीवर्धन मध्ये स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियाना ची यशस्वी सांगता.

57

श्रीवर्धन मध्ये स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियाना ची यशस्वी सांगता.

श्रीवर्धन मध्ये स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियाना ची यशस्वी सांगता.

✍ रशाद करदमे ✍
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 9075333540 📱

श्रीवर्धन :
“स्वच्छ सागर सुरक्षित सागर” या अभियाना मार्फत आज सांगता करण्यात आली. हि मोहीम ५ जुलै २०२२ रोजी सुरु करण्यात आली होती. या मोहिमेद्वारे समुद्रकिनाप्यावर प्लास्टिक तसेच प्रक्रिया न केला जाणारा कचऱ्यामुळे समुद्रातील सजीवांचा नाश होतो. तसेच पर्यावरणाचा नाश होतो. म्हणून प्रदुषणाला आळा बसावा व लोकांमध्ये या बाबत जन जागृती व्हावी. यासाठी हि मोहिम राबवण्यात आली. दरवर्षी भारतीय तटरक्षक दलामार्फत विविध ठिकाणी स्वच्छ भारत हि मोहिम राबविली जाते. आज स्वतंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने भारतातील ७५००+ स्वयंसेवकांच्या मदतीने किनारपटट्या स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुबंधाने आज श्रीवर्धन नगरपरिषदेच्या किनार पॅट्टी वर सर्व शैक्षणिक संस्था, शासकिय कार्यालये, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, मंडळे यांनी सहभागी होऊन पूर्ण किनार पट्टी स्वच्छता करण्यात आपला मोलाचा वाटा उचलला. दिनांक १७/०९/२०१२ रोजी श्रीवर्धन नगरपरीषदे मार्फत विविध कार्यक्रमांचे करण्यात आले. सदर अभियान यशस्वी करण्यात सर्वांचे सहभाग दिसुन आले. त्या मुळे ही मोहीम यशस्वी रित्या पार पडली.