मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मराठवाडा भूमिपुत्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारांचा गौरव
✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर : 9860020026
जाफ्राबाद :- दि.17 स्थानिक न्यु हायस्कुल जाफ्राबाद येथे भव्य दिव्य अशा मराठवाडा मुक्ती संग्राम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री साहेबराव बोरकर व प्रमुख अतिथी म्हणून पोलिस स्टेशन चे उपनिरीक्षक राजाराम तडवी साहेब व पालक प्रतिनिधी म्हणून श्री भास्कर भिकाजी दांडगे आणि लिंबाजी गाढवे आदी उपस्थिती होते सकाळी 7: 50 ला ध्वजारोहण याच्या मुख्याध्यापक श्री साहेबराव बोरकर यांच्या हस्ते झाले.
त्यानंतर भव्यदिव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात समीक्षा पंडित,संध्या सरोदे,साक्षी मरकड यांच्या मधुर स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर स्काऊड युनिट संचालन व लेझिम विविध प्रत्यक्षिक साजरी करून समुदायक कवायत झाली.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजन वाद विवाद स्पर्धेत बक्षीस वितरण स्पर्धेचा विषय होता 1.शिक्षण ऑनलाईन योग्य की अयोग्य 2.मैदानी खेळ खेळणे योग्य की अयोग्य.यामध्ये प्रथम प्रियांका दांडगे,कोमल भगवान मुरकुटे,प्रत्येकी 500 रुपये रोख व प्रमाणपत्र द्वितीय बक्षीस ऋतुजा गाढवे,वैशाली सरोदे 300 रू व प्रमाणपत्र वैष्णवी मोरे सिमा पडोळ तृतीय बक्षीस 200 रू व प्रमाणपत्र. दुसरागट प्रेरणा देवडे,प्रियांका सुरडकर प्रथम 300रू व प्रमाणपत्र द्वितीय बक्षीस वेदांत मुरकुटे व समीक्षा पंडित 200रू रोख व प्रमाणपत्र तृतीय बक्षीस साक्षी गुळवे गौरव जाधव 100 रू रोख व प्रमाणपत्र इतर स्पर्धेतील विजेतांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यानंतर मराठवाड्याच्या भूमिपुत्र शिक्षकांचा शाल श्रीफळ पुषपगुच्छ देऊन मुख्यद्यापकांच्या हस्ते गौरव करण्यात आला.याप्रसंगी रेखाटलेल्या रांगोळी सर्वांचे लक्षवेधून घेत होत्या.या प्रसंगी विध्यार्थी पालकांकडून विद्यार्थांना जवळपास 1800रू बक्षीस रोख मिळाले. त्यानंतर आजच्या दिनाचे औचित्य श्री संतोष राठोड,शिवाजी अहिरे,श्रीमती जे. एस.भारंबे व श्री जी. डी.लहाने आदी शिक्षकांनी विचार मांडले श्री लहाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे महत्त्व सांगत असताना प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला त्यानंतर अध्यक्षीय समारोप करताना श्री साहेबराव बोरकर म्हणाले देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर मराठवाड्यावर निजाम राजवटी सत्ता होती निजाम निर उस्मान अली खान याची सत्ता होती महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आठ जिल्हे 78 तालुके 63 बाजारपेठेची मोठे शहर व 64 हजार कि. मी.भूप्रदेश असलेल्या हा भाग होता या राजवटींच्या अन्याय अत्याचारात जनता भरडून निघाली होती. या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंदतीर्थ,गोविंद श्रॉफ,डॉ.विजय काबरा रवी नारायण रेड्डी देविसिंह चौव्हण बाबासाहेब पराजणे मनिचंद पाठोडे जनार्दन होटिकर गुरुजी गोविंद पानसरे जनार्दन मामा नागापुरकर जालना व महिला प्रतनिधी दगडाबाई शेळके यादिने लढा दिला. शेवटी तत्कालीन केंद्रीयगृह मंत्री सरदार वल्लभाई पटेल पोलिस अँक्शन सुरू करण्याचा आदेश दिला. छतीवर वार देह झिजविला मातीसाठी कित्येकांनी प्राण अर्पिले मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्त सांडले आपल्यासाठी समारोपीय भाषण करून प्रमुख अतिथी पोलिस उपनिरीक्षक तडवी साहेब पोलिस स्टेशन जाफराबाद यांच्या हस्ते हॉलीबोल स्पर्धांचे झाले कार्यक्रमाचे रं गदार व बहारदार सूत्रसंचालन क्रिडा शिक्षक श्री अशोक कोल्हे यांनी केले तर आभार प्रदर्शन सह शिक्षक बापूराव पाटील यांनी करून कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीताने झाली.मराठवाडा मुक्ती संग्राम दिन समारोह सांस्कृतिक कार्यक्रम शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारानी परिश्रम घेतले.