इंदापूर विभाग पालवी मित्र मंडळा तर्फे रक्तदान शिबिर संपन्न !

62

इंदापूर विभाग पालवी मित्र मंडळा तर्फे रक्तदान शिबिर संपन्न 

इंदापूर प्रतिनिधी

संतोष मोरे 

7744812027  

पालवी मित्र मंडळ इंदापूर एस. एस. सी १९९६ ब्याच यांच्यावतीने रविवार दि. १८ सप्टेंबर २०२२ रोजी रा.जि.प शाळा तळाशेत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

     पालवी मित्र मंडळ हे शैक्षणिक , सामाजिक, सांस्कृतिक , क्षेत्रात कार्य करणारे मंडळ असून. मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी रक्तदान शिबीराचे अयोजन केले जाते. तसेच या सामाजिक मंडळाच्या वतीने वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक, साहित्य वाटप, स्वच्छता किट वाटप, व्याख्यान शिबीरे , गुरुजनांचे सत्कार आशा विविध कर्यक्रमाचे आयोजन केले जाते 

    सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी पालवीचे अध्यक्ष: राजेश संसारे , उपाध्यक्ष: किरण मंचेकर, सचिव: हेमंत बारटक्के, खजिनदार: आकाश वाणी, अमोल पाटील, मंगेश कडवेकर, मयुरेश सावंत, तुषार पलन,सागर सकपाळ, सुरेश पोटले, प्रवीण दांडेकर , विजय सांगळे व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.