माणगांव तालुक्यातील बामणोली गावात सर्पदंश होऊन एका व्यक्तीचा मृत्यू

48

माणगांव तालुक्यातील बामणोली गावात सर्पदंश होऊन एका व्यक्तीचा मृत्यू

माणगांव तालुक्यातील बामणोली गावात सर्पदंश होऊन एका व्यक्तीचा मृत्यू

✍️सचिन पवार ✍️

रायगड ब्युरो चीफ

📞8080092301📞

 

माणगांव :-माणगांव तालुक्यातील बामणोली गावातील राम सकपाळ व्यक्ती हे सकाळी आपल्या गुरांना चारा आणण्यासाठी गेले असता त्यांना तिथे सर्पदंश झाला त्यांनी तेथून आपल्या घरी येऊन मला सर्पदंश झाला आहे हे सांगितले असता त्यांना माणगांव येथील उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे हळविण्यात आले परंतु उपचार घेत असताना डॉक्टर यांनी त्यांना मृत घोषित केले. हे पाहून बामणोली गावावरती दुःखाचा डोगर कोसळला आहे.सामाजिक क्षेत्रात वर्चस्व कोणालाही कधी न दुखावणारा बामणोली चा हिरा हरपला राम नथु सकपाळ आपल्या वयाच्या 55 वर्षी बामणोलकारांना सोडून गेला त्याच्या पच्यात एक मुलगा एक मुलगी व दोन बायका दोन भाऊ एक बहीण असा सकपाळ कुटुंब आहे.

राम नथु सकपाळ हे सकाळी 7 वा. च्या सुमारास गुरांना चारा आनण्यासाठी गेले असता तेथे त्यांना सर्पदंश झाला असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो या करिता समस्त ग्रामस्थ बामणोली यानी भावपुर्ण श्रद्धांजली वाहली आहे.