प्रधानमंत्री योजनेच्या माध्यमातून जनतेला विविध योजनेचं थेट लाभ,अतुल पाटील...

प्रधानमंत्री योजनेच्या माध्यमातून जनतेला विविध योजनेचं थेट लाभ,अतुल पाटील…

प्रधानमंत्री योजनेच्या माध्यमातून जनतेला विविध योजनेचं थेट लाभ,अतुल पाटील...

शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:20/09/2022

रोहा:भारतीय म्हणून प्रत्येकाला आभिमान वाटावा यासाठी ज्या युग पुरुषाने भारत देशाची महानता सिद्ध करून संपूर्ण जगाला आपली दखल घ्यावयास भाग पडले. असे जागतिक लोकप्रिय नेते *पंतप्रधान नरेंद्र मोदीजी* यांनी एक जबाबदार राजनेता म्हणून केलेल्या अतुलनीय कार्याची कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे.
देशाने बहुमताने पंतप्रधान म्हणून दिलेली जबाबदारी स्वीकारताना जन सामान्यांचा विकास हाच देशाचं विकास याची जाणीव लक्षात घेतली . दीन दुबळ्या जनेतेला देशाच्या अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी त्यांनी विविध अमुलाग्र बदल घडवून विविध योजना थेट जनते पर्यंत कोणताही मतभेद न करता पोहचवल्या. त्या करिता *डी बी टी योजना , आधारकार्ड* इत्यादी प्रणाली बेधडक राबविल्या. ज्या मुळे देशातील भ्रष्टाचारास आळा बसला . ज्या द्वारे *सबका साथ सबका विकास* हे ब्रीद वाक्य आज कृतीत उतरलं.
यासाठी मान. नरेंद्र मोदींजी यांनी सर्व प्रथम २८ ऑगस्ट २०१४ साली आणलेली *प्रधानमंत्री जणधन योजना* व्दारे सर्व सामान्य जनतेला शुन्य बॅक खाते खोलुन त्यांना देशाच्या आर्थीक प्रवाहात आणले . तसेच त्या खात्या सोबत वार्षिक १२ रु हप्ता भरून *प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना* व वार्षीक ३३०रु चा *प्रधानमंत्री जिवन ज्योती योजनेच* लाभ देवून कुटूंबास २ लाख रू चे आर्थिक संरक्षण दिले . तसेच *डिजीटल इंडियाच्या* माध्यमाने सर्व बँकीग सेवा व व्यापारी क्षेत्र पेपर लेस करून त्याला व्यवसायाला गती मिळाली . तसेच डिजिटल इंडिया च्या माध्यमाने शहरी व ग्रामीण भागात *2.6 लक्ष *ग्राहक सेवा केंद्र* सुरू केल्याने बेरोजगार युवकांना सरकारी व निमसरकारी सेवा आपल्या भागातील जनतेला देण्यात देता आली. त्या योगे मोठे रोजगार निर्मिती झाली.
*कौशल विकास योजने* अंतर्गत गरीब गरजु विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले . तसेच *स्टार्ट अप योजनेतून* नावीन्य पुर्ण व्यवसायांच्या उभारीसाठी आर्थिक मदत देवून रोजगार वाढवला .
*मेक इन इंडिया* माध्यमाने भारतातच विविध वस्तु व सेवांच उत्पादन करण्यासाठी उद्योगांना चालना दिली . ज्या योगे भारतात नवीन उद्योग उभे राहून भारतात जागतिक गुंतवणुक वाढू लागली . ज्या मुळे बेरोजगारीचा प्रश्न सुट नार आहे .
अस्वच्छतेमुळे होणारे रोगराई व पर्यावरणावरील दुष्परीणाम टाळण्यासाठी *स्वच्छ भारत मिशन योजना* संपुर्ण भारत भर राबवून त्याची अंमलबजावणी करण्यात आली . त्यामध्माने दुषित होत चाललेली देशाची पवित्र गंगा नदी
*नमामी गंगा योजने* तून स्वच्छ करण्यात आली.
महिलांच सामाजिक मान सन्मान वाढावा म्हणुन *बेटी पढाव बेटी बचाव योजना* जागृत केली .
तसेच *प्रधानमंत्री उज्वला योजनेतून* मोफत गॅस कनेक्शन दिले ज्या मुळे धुराच्या प्रदुषणापासून महिलांची सुटका झाली .
एक वेळ अशी होती की लहान दुकानदार , व्यापारी यांना बँका उभे करीत नसत परंतू २०१५ साली *पीएम मुद्रा लोन* योजनेतून ५० हजार पासून १० लाखापर्यंत कर्ज सहज उपलब्ध झाले. ज्या मुळे लहान मोठे व्यवसायांना उभारी मिळाली .
सर्व सामान्यांच घराच स्वप्न पूर्ण व्हाव म्हणून *प्रधान मंत्री आवास योजने* च्या माध्यमातून ग्रामीण भागात लाभार्थ्यस १ लाख २० हजार आर्थिक मदत व शहरी भागात २ लाख ६० हजार रू मदत दिली जात आहे . तसेच हगणदारी मुक्त गाव व्हावा म्हणून *प्रधानमंत्री शौचालयाच्या निधी* बांधकामास १२ हजार रू थेट लाभार्थाच्या खात्यात जमा केले जात आहेत .
ग्रामीण भागातील विकासासाठी *पंडित दीन दयाळ उपद्याय ग्राम ज्योती योजना कौशल्य योजना*.
गरीब कल्याण योजना राबवल्या जात आहेत.
आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या *आयुषमान भारत आरोग्य योजना* ज्या माध्यमाने मोफत ५ लाखापर्यंत शस्त्रक्रिया किंवा इतर आजार उपचारासाठी मदत मिळते .
तसेच पंतप्रधानांनी निराधार , विधवा महिला अपंग या दुर्बल लाभार्थ्य ना ६०० रु मदत वाढवून महिना १००० रु केली .
भारत देश्याची अर्थव्यवस्था कृषीप्रधान असल्याने कृषी क्षेत्राचा विकास होण्यासाठी कृषी पुरक व्यवसाय जसे दुग्ध व्यवसाय , मत्स्य व्यवसाय प्रक्रीया उदयोग यांना चालना मिळण्यासाठी *प्रधानमंत्री सुक्ष्म उदयोग* प्रकल्यासाठी वैयक्तिक ७५ व सामुहिक गटास ९० टक्के अनुदानाच्या योजना प्रत्यक्षात राबवण्यात आल्या.
बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीवर होवून त्याचा शेतकऱ्यांवरील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी *प्रधानमंत्री फसल वीमा योजनेच्या* माध्यमाने शेती व शेतकऱ्याला संजीवणी देण्याचे कार्य घडत आहे.
तसेच स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशाचा प्रमुख व्यवसाय शेती टिकूण राहण्यासाठी शेती मध्ये आपल संपूर्ण आयुष्य खर्चवणाऱ्या बळी राज्यासाठी
*किसान सन्मान निधीच्या* माध्यमाने वार्षीक ६०००रू पेंशन योजना सुरु करणारे पाहिले प्रधान मंत्री मान. नरेंद्र मोदी ठरले . तसेच शेतमालाचा हमी भाव वाढवून बोनस स्वरूपात शेतकऱ्यांना मदत केल्याने शेतीतील लागवड क्षेत्र वाढले .
तसेच सुधारीत कृषी व्यवसायात यांत्रीकीकरण करण्यासाठी *प्रधान मंत्री महा डीबीटी* योजनेतून ट्रक्टर, पंप , यांत्रीक साधनांसाठी ७५ टक्के अनुदान दिल्याने तरूण वर्ग शेती कडे वळून खऱ्या अर्थाने शेतीमध्ये क्रांती घडवली आहे .
असंघटीत कामगारांच्या हक्कासाठी त्यांची सरकार दरबारी नोंद करण्यासाठी *ई श्रम कार्ड, श्रम योगी मानधन योजना, नॅशनल पेंशन योजना, जन औषधी योजना* इत्यादी विविध योजना राष्ट्रीय स्तरावर राबवल्या जात आहेत .
अश्या असंख्य योजना थेट जनतेपर्यंत पोहचवून त्यांना राज सत्तेवर विश्वास निर्माण करून खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून मान. नरेंद्र मोदी यांना लाख लाख सलाम.
अतुल पाटील, कोकबन, रोहा यांनी मिडीया वार्ता न्युज ला प्रतिक्रीया दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here