अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

59

अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

🖋 अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

📱 8830857351

 

•अवघ्या चोविस तासात गुन्हा उघडकिस,

•प्रियकर शिक्षक व मृतकांच्या पत्नीला अटक 

•स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

चंद्रपूर: अनैतिक प्रेमप्रकरणात पती बाधा बनत असल्याने पत्नीने शिक्षक असणाऱ्या प्रियकराच्या मदतीने आजारी पतीचा उशीने गळा दाबून खून केल्यानंतर चोरीचा बनाव रचण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. अवघ्या चोविस तासात स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने खुनाचा गुन्हा गुन्हा उघडकीस आणून आरोपी प्रियकर शिक्षक स्वप्निल ताराचंद गावंडे रा. घुटकाळा तलाव, व मृतकांची पत्नी सुनिता मनोज रासेकर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड परिसरात मनोज रासेकर यांचा गुरूवारी मध्यरात्री अनोळखी इसमाकडून खून करण्यात आला होता. मध्यरात्री खून झाल्याने पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी घटनास्थळाला भेट देवून स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, संदीप कापडे यांनी गोपनिय माहिती काढली असता, मृतकाच्या पत्नीचे मुलीच्या शाळेतील एका शिक्षकासोबत ओळख निर्माण होवून प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. प्रेमसंबंधात पती बाधा बनत होता. पती मनोज रासेकर हा मागील पंधरा दिवसापासून बिमार असल्यामुळे आजारपणामुळे पतीचा मृत्यू देखावा निर्माण करून पतीच हत्येचा कट रचला. प्रियकराच्या मदतीने पतीचा उशीने गळा आवळून खून केला. मृतकाच्या आईला जाग आल्याने आरडाओरड झाला. यावेळी दोघांनीही चोरीचा बनाव रचून प्रियकर पसार झाला.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात खूनाचा गुन्हा उघडकीस आणत आरोपी प्रियकर शिक्षक स्वप्निल ताराचंद गावंडे व मृतकाची पत्नी सुनिता मनोज रासेकर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दोघांनीही गुन्हा कबुल केला आहे.