भरधाव ट्रकने पाच जनावरांना चिरडले, चार जनावरांचा मृत्यू 

54

भरधाव ट्रकने पाच जनावरांना चिरडले, चार जनावरांचा मृत्यू 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर: नांदा गावाच्या मुख्य शिवाजी चौकात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी पहाटे 4 वाजताच्या सुमारास एका भरधाव ट्रकने तब्बल पाच जनावरांना चिरडले. यामध्ये चार जनावरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक जनावर जखमी झाले. त्याच्यावर अल्ट्राटेकचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय ठाकरे उपचार करीत आहेत.

मुख्य रस्त्यावर एक गाय, तीन बैल व छोटे वासरे रस्त्यावर निवांत बसले असताना वणीवरून गडचांदूरच्या दिशेने जाणार्‍या ट्रकने (एमएच 40 सीडी 6791) या पाचही जनावरांना चिरडले. नागरिकांनी धाव घेत ट्रकला घटनास्थळीच थांबविले. ट्रकचालकाने स्वतःला गडचांदूर पोलिसांच्या स्वाधीन केले.