निवेदिता महिला सहकारी संस्थेची वार्षिक साधारण सभा संपन्न

अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो: 8830857351
सिंदेवाही : निवेदिता महिला क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी नवरगाव र. नं. १२०८ ची २१ वी वार्षिक साधारण सभा संस्थेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा बाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आमसभेच्या अध्यक्षा सुनंदा बाकरे यांनी निवेदिताच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन दीप प्रज्वलन केले व लक्ष्मीस्तवणाने सभेला प्रारंभ झाला.
संस्थेच्या अध्यक्षा यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले व संस्था राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती सादर केली. संस्थेचे व्यवस्थापक भगवान नारदेलवार यांनी संस्थेची आर्थिक पत्रके वाचून दाखविली. विषय सुचीनुसार सर्व विषयावर साधक बाधक चर्चा करून विषयांना मंजुरी देण्यात आली.
संस्थेच्या एकूण ठेवी रुपये ११८.२५ कोटी आहेत. संस्थेनी अन्य बँकेत रुपये ३५.९३ कोटी गुंतणूक केलेलीआहे. संस्थेचे वसूल भाग भांडवल रुपये १७७.९५ कोटी असून स्वानिधी रुपये १२ कोटी ६५ लाख ३९ हजार ७१७/- आहे. अहवाल वर्षात संस्थेला रुपये १ कोटी ५० लाख १० हजार ८४२ / – नफा झालेला आहे व संस्थेनी सभासदांना या वर्षी १५ टक्के लाभांष जाहीर केला आहे.
नवरगाव, सिंदेवाही, वासेरा, गुंजेवाही, ब्रम्हपुरी, चिमूर, नेरी, शेगाव, वड्सा येथे संस्थेच्या शाखा आहेत. संस्थेच्या स्थानापासून ऑडिट वर्ग ‘ अ ‘ असून संस्थेच्या वाढत्या वीश्वासार्हतेमुळे ठेवीत वाढ होत आहे. विदर्भात अग्रणी महिला पतसंस्था म्हणून संस्थेने नावलौकिक मिळविलेला आहे. संस्था प्रमुख दीपक जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनात संस्थेच्या अंकेक्षण अहवालासंबंधी चर्चा केली. तसेच सर्व सभासदांना आपले बचत खाते व मुदती ठेव खाते उघडण्यासंबंधी आवश्यक सूचना केल्या.