खळबळजनक घटना……
लोकमान्य टिळक शाळेच्या दोन
विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
दाताळा भागातील इरई नदीत पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
जिल्हा स्टेडियम जवळील लोकमान्य टिळक विद्यालय येथील हे दोन्ही विद्यार्थी असून, ते दाताळा येथील रहिवासी आहेत. गौरव वांढरे (सोळा वर्षे) आणि रोहन बोभाटे (सतरा वर्ष) अशी मृत तरुण विद्यार्थ्यांची नावे आहेत. दरम्यान यातील एकाचा मृतदेह सापडला असून, दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचे काम युद्धस्तरावर पथकाच्या माध्यमातून केले जात आहे. गावकऱ्यांनी या भागात घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.