माता सुरक्षित तर घर सुरक्षित उपक्रमार्तंगत जागरूकता अभियान "राष्ट्रपति महात्मा गांधी महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय यांचा संयुक्त उपक्रम"

माता सुरक्षित तर घर सुरक्षित उपक्रमार्तंगत जागरूकता अभियान

“राष्ट्रपति महात्मा गांधी महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय यांचा संयुक्त उपक्रम”

माता सुरक्षित तर घर सुरक्षित उपक्रमार्तंगत जागरूकता अभियान "राष्ट्रपति महात्मा गांधी महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय यांचा संयुक्त उपक्रम"

बाबा मेश्राम
सावली तालुका प्रतिनिधि
7263907273

सावली : – राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली यांच्या महिला अध्ययन विभाग व ग्रामीण रुग्णालय तालुका सावली यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.27) ला महाराष्ट्र राज्य शासन यांच्याकडून “माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” व मातृत्वाचे सन्मान या उपक्रमा अंतर्गत महिला-स्त्रिया यांनी घ्यावयाची काडजी तसेच विविध होणाऱ्या रोगापासून जागरूकता अभियान विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी कार्यक्रम घेण्यात आले
या कार्यक्रम माचे अध्यक्ष महाविद्या लयाचे प्रभारी प्राचार्य ए.टी खोब्रागडे तर प्रमुख अतिथि महिला अध्ययन विभागाचा प्रमुख डॉ.राजश्री मार्कंडिवार डा विकास नेत्तुलवार,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ धनश्री मर्लावार,महाविद्यालयाचे प्रा.डॉ प्रेरणा मोडक,प्रा. संदीप देशमुख, प्रा.वताखरे,प्रा.चौधरी, प्रा.सोनटक्के आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.श्री.विकास नेत्तुलवार, यांनी सरकार कडून दिलि जाणारी मोफत आरोग्य सेवा याबद्दल सविस्तरपणे माहिती दिली व तपासणीसाठी विध्यार्थिनीना प्रेरित केले तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ.सौ.धनश्री मरलावार यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांना होणारे त्रास, रक्ताचे प्रमाण तसेच आहार या बद्दल माहिती दिली . या माध्यमातून विद्यार्थिनींना आरोग्य कार्ड सहज रित्या मिळणार आहेत.या वेळी ग्रामीण रुग्णालय सावली तर्फे डॉ.पंकज कारडोजे ,डॉ.प्रकाश बाकडे, धम्मपूर्ण गौतम , सचिन भोयर महाविद्यालयाचे डॉ. पाटील मॅडम ,स्मिता राऊत मॅडम , सौ. किरण कापगते मॅडम ,श्री.निखाडे सर , श्री.सोनटक्के सर आणी महाविद्यालयाचे विद्यार्थीनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाचे आयोजन डॉ.राजश्री मार्कंडेवार यांनी केले, प्रस्ताविक श्री. आशिष शेंडे सर तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचा विद्यार्थी कमलेश गेडाम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here