आदिवासी संघटनांचे वरूडच्या पोलीस ठाणेदरांना निवेदन

53

आदिवासी संघटनांचे वरूडच्या पोलीस ठाणेदरांना निवेदन

हर्षल राजेंद्र पाटील

मोर्शी तालुका प्रतिनिधी

मो: 8600650598

हिवरखेड :- 5 ऑक्टोबर ला येत असलेल्या दसऱ्याच्या दिवशी वरूड तालुक्यात कुठेही आदिवासी साजाचे इष्ट महापुरुष असलेल्या महाराजा रावण मडावी यांचे दहन होऊ नये यासंदर्भात वरूड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. प्रदीप चौगावकर साहेब व मा. तहसीलदारांना वरूड तालुक्यातील विवीध आदिवासी संघटनांकडून निवेदन देण्यात आले. देशातील विविध भागात दसऱ्याच्या दिवशी रावण महापूजा केली जाते. योगायोगाने त्याच दिवशी गोंडवाना सम्राज्ञी वीरांगना राणी दुर्गावती यांची जयंती येत असल्याने राणी दुर्गावती जयंती व महाराजा रावण पूजन साजरा करणार असल्याचे निवेदन देखील देण्यात आले आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टी, बिरसा क्रांती दल व बिरसा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांतर्फे हे निवेदन देण्यात आले. 

 यावेळी बी.के.डी. चे जिल्हा संघटक प्रा. कमलनारायण उईके, मनोज उईके, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोहरजी धुर्वे, महासचिव प्रल्हादजी धुर्वे, बिरसा ब्रिगेडचे अजय युवनाते, सूरज भलावी, शंकर सिरसाम, धर्मेंद्र कोकोडे, प्रीतम धुर्वे, सिद्धार्थ बासंदे व गजानन धुर्वे ई. उपस्थित होते.