चंद्रपुरात पहिल्यांदाच श्री माता महाकाली महोत्सव – आमदार जोरगेवार

आश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर : चंद्रपूरची आराध्य देवी श्री माता महाकाली मंदिर परिसरात पहिल्यांदाच श्री माता महाकाली महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १ ते ४ ऑक्टोबर या कालावधीत हा महोत्सव होणार असून श्री महाकाली माता सेवा समितीच्या पुढाकारातून होणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम होणार आहे. माता महाकालीचा भव्य पालखी सोहळा महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार असल्याची माहिती संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

१ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता श्री माता महाकालीची आरती झाल्यानंतर महोत्सवाचे उद्घाटन

होणार आहे. राज्याचे अन्न व औषण प्रशासन मंत्री संजय राठोड यांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. पत्रकार परिषदेला अजय जयस्वाल, बलराम डोडाणी, सुनिल महाकाले, अॅड. मोगरे, मुंधडा यावेळी उपस्थित होते. २ ऑक्टोबरला निघणाऱ्या माता महाकाली नगर प्रदक्षिणेसाठी आठ किलो वजनाची मातेची चांदीची मूर्ती देण्याची घोषणा सराफा आसोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती. सदर मूर्ती तयार झाली असून शनिवारी शोभायात्रा काढत मातेची मूर्ती महाकाली मंदिर येथे नेण्यात येणार आहे, असे सराफा असोसिएशनचे शहर अध्यक्ष भारत शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here