महारास्ट्र राज्याच्या अंतिम टोकावर दिसते तेलंगाना राज्याची झलक. मोठ्या उत्साहने खेळतात 9 दिवस बतकम्मा

अमितकुमार त्रिपटी

अहेरी उप-जिल्हा प्रतिनिधी

मोब 9422891616

गड़चिरोली जिल्ह्यातील अहेरी उप विभागात अनेक गावांनमध्ये बतकम्मा हा सण नऊ दिवस साजरा करण्यात येतो. ९ दिवस वेगवेगळ्या प्रकारे बतकम्मा देवीला सजावट करतात. पहिल्या दिवशी येंगीलीफुला बतकम्मा असे म्हणतात. पितृ मोक्ष अमावस्येच्या दिवसापासून प्रारंभ करतात. दुसऱ्या दिवसाला अटकुला बतकम्मा असे म्हटले जाते. तिसऱ्या दिवशी मुद्दापप्पू बतकम्मा, चौथ्या दिवशी नानाबीय्यम बतकम्मा, पाचव्या दिवशी अटला बतकम्मा, सहाव्या दिवशी आलेगीना बतकम्मा असे म्हटले जाते. याचा अर्थ रुसलेली बतकम्मा देवी असा असुन या दिवशी बतकम्मा खेळत नसतात. सातव्या दिवशी वेपकायला बतकम्मा, आठव्या दिवशी वेण्णामुद्दाला बतकम्मा आणि नवव्या दिवशी सहूला बतकम्मा असे म्हटले जाते.

शुद्ध अष्टमीच्या दिवशी वेगवेगळया प्रकारच्या फुलांनी सजावट करून शेवटचा दिवस म्हणून नवीन कपडे धरण करून दांडिया गीत आणि तेलगू गीत म्हणत मोठ्या उत्साहाने साजरा करून बँड वाजा वाजवित प्राणहिता नदी घाटावर विसर्जन करण्यासाठी घेवून जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here