कळमेश्वरात अनेक प्रतिष्ठितांची स्वप्नं भंगली
राखीव जागेचा परिणाम : मोठ्या ग्रामपंचायतींवर कारभारणीच करनार राज्य
युवराज मेश्राम प्रतिनिधी
कळमेश्वर:- तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती नुकतीच काढण्यात आली. सोडतीमध्ये तालुक्यातील काही मोठ्या ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी तर अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गासाठी राखीव निघाल्याने सरपंचपदासाठी गेल्या काही दिवसांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांची स्वप्नच भंगले आहे. त्यामुळे तालुक्यात कही खुशी, कही गम असल्यासारखी परिस्थिती आहे.
तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींपैकी ग्रामपंचायतींच्या कारभारणी महिला असणार आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटली की, ग्रामीण भागातील नागरिकांना उधाण येते. असे म्हणतात की, एक वेळ लोकसभेची निवडणूक सोपी असते. परंतु ग्रामपंचायत निवडणूक अवघड ठरते. मंगळवारी येत्या पाच वर्षासाठी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली. तालुक्यातील ५० ग्रामपंचायती पैकी तब्बल २६ गावात कारभारी महिला राहणार आहेत त्यामुळे बहुतांश इच्छुकांचा हिरमोड झाला.
तालुक्यातील भाजप व काँग्रेसचा गड असलेल्या काही मोठ्या ग्रामपंचायती सर्वसाधारन महिला प्रवर्गासाठी राखीव निघाल्या आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी गोंडखैरी व धापेवाडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारन महिलांकडे राखीव झाल्याने मातब्बर गाव पुढार्यांचे सरपंच पदाचे स्वप्न भंगले आहे. तालुक्यातील मध्यम अशा दहेगाव सर्वसाधारन तर घोराड अणु.जाती महिला प्रवर्गाकडे राखीव निघाले.
त्याचप्रमाने खालील प्रमाने सोडतीतील गावे
# सर्वसाधारण महिला प्रवर्ग सोनोली, तिष्टी (बु), चाकडोह, धापेवाडा ( बू ), सावळी (बू), सावळी खूर्द, कन्याडोल, गोंडखैरी, आष्टीकला, दहेगाव, साहुली, सोनेगाव
# नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव तेलकामठी, म्हसेपठार, बुधला, निळगाव, पिपळा (किन.),पानउबाळी,खैरी (लख.)
#अनुसूचित जाती जमाती महिला प्रवर्ग खुमारी, आदासा, वरोडा, घोराड , उपरवाही,सावंगी (तो.) या ग्रामपंचायतींवर महिलाराज असनार आहे.तर
सर्वसाधारण मध्ये मांडवी, लोहगड, तिडंगी, नांदिखेडा, कोहळी, सुसुंद्री, मोहगाव, झुंणकी, मढासावंगी, लोणारा, तोंडाखैरी, कळंबी.
# नागरिकांचा मागास प्रवर्ग पीलकापार, पारडी देशमुख, बोरगाव ( बू ), बोरगाव (खु ), वाढोणा ( बु ),सेलू ,
# अनुसूचित जाती जमाती खापरी ( कोठे ), निमजी, लिंगा, भडांगी, उबाळी , परसोडी,अशी आहेत.
ग्रामपंचायतींच्या सरपंच पदावर विराजमान होण्यासाठी अनेकांनी स्वप्न बघितले होते त्यासाठी इच्छुकांनी गावातील मतदारांची भेट घेऊन संपर्क मोहीम सुरू केली होती परंतु ग्रामपंचायतींची सरपंचपदी महिला व विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव निघाल्याने त्यांच्या मसुद्यावर पाणी फिरले आहे