सेवा पंधरवडा निमित्ताने दिव्यांग व्यक्तींसाठी श्रीवर्धन कुटीर रुग्णालयात कार्यकम संपन्न

76

सेवा पंधरवडा निमित्ताने दिव्यांग व्यक्तींसाठी श्रीवर्धन कुटीर रुग्णालयात कार्यकम संपन्न

 

रशाद करदमे

श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी

मो:9075333540

श्रीवर्धन: राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने एकता दिव्यांग कल्याणकारी संस्था श्रीवर्धन यांच्या प्रयत्नाने श्री. निलेश बारक्या नाक्ती यांनी एकता दिव्यांग कल्याणकारी संस्था श्रीवर्धन मार्फत दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी श्रीवर्धन कुटीर रुग्णालयात पार पाडण्यात आला.

या राबविण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या दिव्यांग अस्मिता अभियान अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र करिता तपासणी व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले जवळ पास १५० हुन अधिक प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमा साठी विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.अमित शेडगे साहेब (प्रांताधिकारी), मा.श्री.सचिन गोसावी साहेब (तहसीलदार), श्री.गौतम देसाई (श्रीवर्धन वैद्यकीय अधिक्षक), सौ.प्रतिमा फडतरे (अलिबाग वैद्यकीय अधिक्षक) यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी वैद्यकीय वर्ग सुद्धा उपस्तिथ होता.