धावपटू अंश नरेंद्र गणवीर याचा बुद्धिस्ट समाज संघ संथागाराच्या वतीने सत्कार 

92

धावपटू अंश नरेंद्र गणवीर याचा बुद्धिस्ट समाज संघ संथागाराच्या वतीने सत्कार 

राजेन्द्र मेश्राम 

गोंदिया शहर प्रतिनिधी

मो: 9420513193

संडे असेंबलीला सर्वप्रथम तथागत बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रा समोर दिप प्रज्वलित करून पूज्य भंते तिसवंसद्वारे त्रिरण पंचशील सामुहिक स्वरांत ग्रहण करून, धम्म देशनेला प्रारंभ करण्यात आले. धम्म देशना देताना पूज्य भंते तिसवंस म्हणाले की, अष्टशिलेला बुद्ध धम्मात फार मोठे महत्व दिले आहे. 

आयु. कवी योगीराज गंगाराम मेश्राम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देत आपले विचार मांडले. त्यानंतर अशं नरेंद्र गणवीर धावपटू यांचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन 800 मिटरची स्पर्धा २ मिनट ४० सेकंदात पूर्ण करून जिल्ह्याचे, समाजाचे, आई वडिलांचे नाव अलौकिक केल्याबद्दल संथागाराच्या वतीने पुष्पगुच्छ व रोख रक्कम २००० रु. रोख देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुढच्या वाटचालीसाठी मगंल कामना देण्यात आली. 

यानंतर संडे असेबंलीला श्रद्धावंताचे नावाचे वाचन करण्यात आले. आयु. लिलाताई विजय डाहाट यांच्या परिवाराच्या वतीने भोजन दान करण्यात आले. संथागाराच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आयु,डि .आर.वैद्य सर यांनी केले व आभार मानताना उपस्थित “उपासक ऊपासिका धम्म बंधु ,यांनी संथागारा विषयी श्रद्धेने १०० रुपये धम्मदान दिले.

सदर कार्यक्रमाचा शेवट सर्वांचे भले होवो या मगंल पाठाने सामुहिक स्वरांत संपन्न करण्यात आले.