जोगेश्वरीत आसनदायी बसथांबा नसल्याने प्रवाशांची होतेय गैरसोय

59

जोगेश्वरीत आसनदायी बसथांबा नसल्याने प्रवाशांची होतेय गैरसोय

पूनम पाटगावे

जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी

मो. नं. – ८१४९७३४३८५

जोगेश्वरी :- जोगेश्वरी पूर्व येथील जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोड परिसरात मेट्रो च्या कामामुळे येथील काही ठिकाणचे बसथांबे बऱ्याच महिन्यापासून काढण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आणि प्रवाशांना उभे राहूनच बसची वाट पाहावी लागते.

        सदर गोष्टीची दखल मनसेने घेत जे. व्ही. एल. आर. येथे मेट्रो च्या कामामुळे काढलेले आसनदायी बसथांबे काम झालेल्या ठिकाणी परत बसवून देण्याची मेट्रो अधिकारी, डी. एम. आर. सी ( दिल्ली मेट्रो ) विभाग तसेच मजास डेपो अधिकाऱ्यांकडे मनसेने पत्राद्वारे मागणी केली.

मनसे उपाध्यक्ष श्री. प्रवीणजी मर्गज यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधीत अधिकाऱ्यांना हे पत्र देत येत्या १५ दिवसात प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीचा विषय लक्षात घेता आसनदायी बसथांबे लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत अन्यथा मनसेकडून आंदोलन छेडण्यात येईल, अशी मागणी विभागाध्यक्ष श्री. बाबुभाई पिल्ले, उपविभागाध्यक्ष श्री. मंगेश गुरव व शाखाध्यक्ष श्री. रमाकांत नर यांसमवेत संबंधित अधिकाऱ्यांकडे केली.