12 डिसेंबर युगात्मा शरद जोशी साहेब व हुतात्मा बाबू गेणु यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण

60

12 डिसेंबर युगात्मा शरद जोशी साहेब व हुतात्मा बाबू गेणु यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

खातखेडा:-  12 डिसेंबर युगात्मा शरद जोशी साहेब व हुतात्मा बाबू गेणु यांच्या पुण्यतिथीनिमित्त मृदगंध मळा खातखेडा येथे शेतकऱ्यांच्या वतीने पुण्यस्मरण करुन देशाच्या स्वातंत्र्यासाठी तरुण पणी हुतात्मा होणाऱ्या क्रांतिकारकास व दुसरे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची लढाई लढुन शेतकऱ्यांच्या मनात आत्मबल उभं करणाऱ्या युगात्मा शरद जोशी साहेब यांना अभिवादन करण्यात आले. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तिन कृषी कायदे म्हणजे नेमके काय? या विषयावर शेतकऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला माजी आमदार सरोजताई काशिकर, रविभाऊ काशिकर, शेतकरी नेते नंदकिशोर काळे, शेतकरी संघटना राज्य कार्यकारिणी सदस्य – हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मधुसूदन हरणे, एड. दिनेश शर्मा, शेतकरी संघटना युवा आघाडीचे राजाध्यक्ष सतिश दाणी, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ऊल्हास कोटमकर ,शशांक सबाणे, पांडुरंग भालशंकर सर यांनी उपस्थित राहुन या तिन्ही कायद्याविषयी शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन या कायद्यातील तरतुदी व त्यामुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे समजावून सांगितले तसेच या कायद्यात काही त्रुटी असुन यातील बारकावे मधुसूदन हरणे यांनी समजावून सांगितले. या कायद्यातील त्रुटी दूर करून हे कायदे आणखी आपल्या बाजुचे व्हावे याकरिता पुन्हा एकदा शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल तेव्हा आता शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या लढाई करीता तय्यार रहावे असे आवाहन शेतकरी नेते नंदकिशोर काळे यांनी केले.


आज सरकार दिल्लीत असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या कायद्यात बदल करून पुन्हा एकदा परवाना राजच उभं करण्याचे प्रयत्न करते आहे तेव्हा आता शेतकऱ्यांनी सजग व्हावे असे आवाहन मधुसूदन हरणे यांनी केले तर जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळण्याची संधी आली तेव्हा तेव्हा उत्तरप्रदेशातील काही शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांचा घात करुन ही संधी नाकारली असे सांगत अभी नहीं तो कभी नहीं म्हणत आता स्वातंत्र मिळविण्यासाठी लढण्यास तयार रहा असे आवाहन एड दिनेश शर्मा यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रमोद तलमले, प्रफुल झाडे,अंगद चौधरी, मुकेश धाडवे, कैलास घोडे, हेमराज ईखार,खोडे गुरुजी,शेख बाबा, महादेव गोहो, रुपरावजी राऊत, दत्ताजी राऊत , शांताराम भालेराव , निलेश ढोक व पुलगाव परीसरातील शंभरावर शेतकरी हजर होते….
या शिबिरानंतर वर्धा जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे बिनीचे कार्यकर्ते हेमंत भाऊ वकारे यांना सुद्धा श्रंद्धाजली अर्पण करण्यात आली..

या कार्यक्रमाचे यशस्वी सुत्रसंचालन शेतकरी संघटना माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे वर्धा जिल्हा प्रमुख गुरुराज राऊत यांनी केले. सचिन डाफे विभागीय अध्यक्ष शेतकरी संघटना माहिती व तंत्रज्ञान आघाडी पुर्व विदर्भ विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी वर्धा जिल्हाध्यक्ष.