बजाज तंत्रनिकेतन महाविद्यालय, चंद्रपूर येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो: 8830857351
चंद्रपूर, 13 ऑक्टोंबर
उपसंचालक, आरोग्य सेवा, मंडळ नागपूर यांच्या परिपत्रकानुसार शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र कमांक ३ बालाजी वार्ड, चंद्रपूर व बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माता सुरक्षीत तर घर सुरक्षीत’ या अभियानाअंतर्गत एक दिवसीय आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन दि. १२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.३० वाजता बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या मल्टीपर्पज हॉल मध्ये करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्वोदय महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष व संस्थेच्या प्रेरणास्त्रोत श्रीमती यशोधरा बजाज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित आरोग्य तपासणी सेविकांना एज्युकेशनल कीट व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे प्राचार्य सतीश ठोंबरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य तपासणी करून लगेच त्यावर उपचार घेणे किती महत्वाचे आहे हे विषद केले.
संस्थेच्या अध्यक्षा निलमणी बजाज यांनी उपस्थितांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या या कार्यकमाचे इव्हेंट ऑर्गनॉयझर प्राध्यापक पी. आर. मालखेडे हे होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापिका सिमा नगराळे यांनी केले