सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने महानिर्मीतीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदभरतीला मुदतवाढ
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो: 8830857351
वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलीत
•सन २०१४ मध्ये महानिमीर्ती कंपनीअंतर्गत कोराडी प्रशिक्षण केंद्रातुन प्रशिक्षण घेतलेल्या २२ सहाय्यक अभियंत्यांना दिलासा.
वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रव्यवहार व पाठपुराव्याने कोराडी प्रशिक्षण केंद्रातुन प्रशिक्षण घेतलेले (के-७०) बॅचच्या २२ सहाय्यक अभियंत्यांचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महानिर्मीती कंपनीतर्फे जाहीरात क्रमांक ०९/२०२२ अन्वये कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांची रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाद्वारे भरण्याकरिता सरळसेवेची जाहीरात प्रसिध्द झाली. यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारिख ११ ऑक्टोंबर २०२२ होती. त्यामुळे सन २०१४ मध्ये महानिर्मीती कंपनीअंतर्गत कोराडी प्रशिक्षण केंद्रातुन प्रशिक्षण घेतलेले (के-७०) बॅचच्या २२ सहाय्यक अभियंत्यांना ११ ऑक्टोंबर २०२२ रोजी ६ वर्षे ११ महिने १६ दिवस होत होते. मात्र उक्त जाहीरातीनुसार ७ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवारच ऑनलाईन फॉर्म भरू शकत होते. त्यामुळे २०१४ च्या बॅच अंतर्गत कोराडी प्रशिक्षण केंद्रातुन प्रशिक्षण घेतलेले उमेदवार या भरती प्रक्रियेतुन वंचित राहणार होते.
राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही बाब समजताच यासंदर्भात त्यांनी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. त्यामुळे सक्षम अधिकारी यांनी उपरोक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार उक्त पदांसाठी अर्ज सादर करण् याची अंतिम दिनांक ११ ऑक्टोंबर २०२२ ऐवजी ३० ऑक्टोंबर २०२२ असेल. त्यामुळे २०१४ च्या बॅच अंतर्गत कोराडी प्रशिक्षण केंद्रातुन प्रशिक्षण घेतलेले २२ उमेदवार अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदाचा ऑनलाईन अर्ज भरण्यास पात्र झाले आहेत. यासंदर्भात शसुरज पेदुलवार आणि प्रज्वलंत कडू यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार अजय खांडरे संचालक महानिर्मीती यांच्यासोबत मुंबई येथे बैठक घेतली व दिनांक १२ ऑक्टोंबर २०२२ रोजी यासंदर्भातील अधिसुचना प्रसिध्द झाली. १३ ऑक्टोबर रोजी संबंधित सहाय्यक अभियंत्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.