डीआरसी खाणीतील वेकोली अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:8830857351

चंद्रपूर- वेकोली चंद्रपूर क्षेत्रातील दुर्गापूर रयतवारी -3 खाणीतील व्यवस्थापक दिनेश कराडे हे 5 हजार रुपयांची लाच घेताना सीबीआय ने रंगेहात अटक केली. प्राप्त माहितीनुसार वेकोली कर्मचाऱ्याला पगारी ड्युटी देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली, मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने वेकोली कर्मचाऱ्याने याबाबत नागपूर सीबीआय लाचलुचपत विभागात तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यावर सीबीआय च्या चमूने 14 ऑक्टोम्बरला डीआरसी एरिया येथील कराडे यांच्या निवासस्थानी धाड मारली.

त्यानंतर वेकोली चंद्रपूर क्षेत्रातील दुर्गापूर व्हीआयपी. गेस्ट हाऊस मध्ये पुढील कारवाईसाठी कराडे यांना नेण्यात आले. कारवाई दरम्यान वेकोली क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व कामगार युनियन चे पदाधिकारी उपस्थित होते. सीबीआय. अधिकाऱ्याने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की चंद्रपूर सहित आमच्या चमूने नागपूर व छिंदवाडा येथे छापामार कारवाई केली. चंद्रपूर वेकोली कार्यालयात काही महत्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे. या लाचखोर अधिकाऱ्यांचे बँक खात्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई डिआयजी. खान यांच्या मार्गदर्शनात डिवायएसपी. संदीप चौगुले, दिनेश तडसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक आर. पी. सिंग, जे.के. मोहन, किरण वरठे आदींनी केली. 7 ऑक्टोम्बरला वणी क्षेत्रातील ताडाळी येथील अधिकाऱ्याला 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. एका आठवड्यात सीबीआय ची ही दुसरी कारवाई असून या कारवाईमुळे वेकोली क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here