धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त जमलेल्या तमाम बौध्द अनुयायांना यंग चांदा ब्रिगेडने भरविला मायेचा घास, हजारो अनुयायांनी घेतला पुरी भाजीचा आस्वाद 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर,16 ऑक्टोंबर: 66 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमीत्त चंद्रपूरच्या पवित्र दिक्षाभुमीवर हजारोच्या संने जमलेल्या बौध्द अनुयायांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मायेचा घास भरविण्यात आला. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दिक्षाभुमी परिसरात पुरीभाजी वाटप स्टाॅल लावण्यात आला होता. यावेळी हजारो अनुयायांनी पुरी भाजीचा लाभ घेतला. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, महिला शहराध्यक्ष वंदना हातगावकर, प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार, शहर संघटक बबलु मेश्राम, विलास वनकर, जितेश कुळमेथे, हेरमन जोसेफ, करणसिंह बैस, विनोद अनंतवार, किशोर बोल्लमवार, अबरार सय्यद, दत्तु गवळी, मुन्ना जोगी, अमन खान, विक्की गुरलवार, प्रणय चहांदे, साई कोटा, रोहित गाजुलवार, मनोज टेकाम, वेनु कनकम, आकार ब्रम्हाणे, मोहित गावंडे, सुरज वालदे, पाटील, सायली येरणे, सविता दंडारे, भाग्यश्री हांडे, शांता धांडे, नंदा पंधरे, आशा देशमुख, प्रेमीला बावणे, माधुरी निवलकर, निलीमा वनकर, अल्का मेश्राम, पुष्पा कुळे, प्रतिक हजारे, बादल हजारे, वंदना हजारे आदिंची उपस्थिती होती.

66 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमीत्त वंदन करण्यासाठी चंद्रपूरातील पवित्र दिक्षाभुमीवर राज्यभरासह बाहेर राज्यातील बौध्द अनुयायी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. जमलेल्या सर्व अनुयायांना मायेचा घास भरविण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दिक्षाभुमी परिसरात पुरी भाजी चा स्टाॅल लावण्यात आला होता. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना वंदन करत पुरी भाजी वाटप कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी हजारो अनुयायानी पुरीभाजीचा लाभ घेतला. यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन आघाडीसह ईतर आघाडींच्या वतीने परिश्रम घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here