माणगांव -पुणे हायवेवरील निजामपूररोड रस्त्यालगत रेल्वे ब्रिजखाली घाणीचे साम्राज्य

53

माणगांव -पुणे हायवेवरील निजामपूररोड रस्त्यालगत रेल्वे ब्रिजखाली घाणीचे साम्राज्य

माणगांव -पुणे हायवेवरील निजामपूररोड रस्त्यालगत रेल्वे ब्रिजखाली घाणीचे साम्राज्य

✍मंगेश मेस्त्री ✍
निजामपूर विभाग प्रतिनिधी
📞 99238 44308📞

माणगांव :-माणगांव पुणे रोडवरील रेल्वेब्रिज च्या खाली केर कचरा व घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. रेल्वे ब्रिज जवळ असलेल्या ईमारतील रहिवाशी घरातील असणारा केर कचरा प्लास्टिक पिशवी मध्ये भरून रस्त्यावर टाकत आहेत त्यामुळे रस्त्यावर व परिसरातील वातावरणात दुर्गधी पसरली आहे. त्यामुळे मच्छराचा व ईतर किटकाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

पुणे रोड असल्यामुळे या रस्त्यावर दिवस रात्र लहान मोठया वाहणाची वर्दल चालू असते रात्रीच्या वेळी हा कचरा घाण खाण्यासाठी बरेसशी गुरे ढोरे तसेच कुत्री मोठया प्रमाणात गर्दी करून जमा झालेली असताना दिसत आहे. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाना अडथळा निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी काळ्या रगांची गुरे ढोरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असतात त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे तसेच रस्त्यावर सोडलेली गुरे ढोरे कुणाची आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे. नगरपंचायत घटा गाडी रोज या परिसरात जात आहे तरी या विभागात घाणीचे साम्राज्य का होत आहे. अशी चर्चा नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. माणगांव नगरपचायत चे तत्पर स्वच्छता व आरोग्य सभापती यांनी सामाजिक स्वच्छता विषयक बातमीची दखल घेऊन रस्त्यावरील कचरा व घाणीमुळे बिकट झालेली मार्ग मोकळा करून घेणे खूप गरजेचे आहे. ही समस्था दैनंदिन असून लक्ष दिल्यास स्वच्छता व नियोजन केल्यास ती सुटेल.

संबंधितानी याची दखल घेऊन शहर स्वच्छतेच्या दृष्टीकोनातुन हे चांगले काम करणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे त्या ठिकाणी पुन्हा घाणीचे साम्राज्य पसरणार नाही याची कल्पना त्याविभागातील रहिवाशांना द्यावी असे आम्ही या मीडिया कडून सांगू इच्छितो.