भुवन येथील रहिवाशी यांचा वंचित बहुजन आघाडी पक्षात जाहीर प्रवेश राष्ट्रवादीला खिंडार !
✍संतोष मोरे✍
इंदापूर विभाग प्रतिनिधी
📞7744812027📞
इंदापूर :-वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अंतर्गत मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर मुलाखती दरम्यान माणगांव तालुक्यातील भुवन गावचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी श्रद्देय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर विश्वास ठेवत. वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला आहे.
अनेक दिवस भुवन गावच्या बौद्ध वाडीतील लोकांमधून नाराजीचा सूर ऐकण्यात येत होता.! मात्र राष्ट्रवादी कडून कोणी ही पुढे येऊन आम्हाला विश्वास देत नव्हते. आमची लोकसंख्या कमी असल्यामुळेच आमच्या विकास कामाकडे दूर लक्ष केलं जातंय की काय अशी खंत कार्यकर्ते यांनी कार्यक्रमात वक्त केली.
त्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भुवन गावचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी घेतली.
सदर पक्ष प्रवेश भुवन गावचे अध्यक्ष. विजय मोरे, उपाध्यक्ष.संतोष म्हस्के, सचिव. राजेश म्हस्के, तसेच रितेश तांबे, मधुकर म्हस्के, राजेंद्र मोरे, विनोद मोरे, सम्यक म्हस्के, रवी मोरे, संतोष मोरे, शरद म्हस्के, समीर म्हस्के, आशा अनेक तरुण कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला आहे.
सदर मुलाखती व पक्ष प्रवेश कार्यक्रमा दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष. रवींद्र चव्हाण सर, रायगड जिल्हा महा सचिव.सागर भालेराव,जिल्हा उपाध्यक्ष. सिद्धार्थ सोनावणे, उपाध्यक्ष.सिद्धार्थ जाधव, उपाध्यक्ष. कुंदन हाटे, सचिव. श्रीहर्ष कांबळे, भा. बौद्ध महासभा माझी जिल्हा अध्यक्ष. विजय जाधव, माणगाव तालुक्याचे नेते शरद पवार, किरणजी मोरे, महेंद्र जाधव, संदीप जाधव, रोहित सकपाळ यांच्या सह अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. त्याच दरम्यान माणगांव तालुका अध्यक्ष पदी प्रवीण जाधव व महासचिव पदी तुषार पवार यांची वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष यांनी नियुक्ती केली. आणि पुढील वाटचालीला हार्दीक सुभेच्छा दिल्या.