श्री साई सेवा प्रतिष्ठानतर्फे गरजूंना भोजनदान

55

श्री साई सेवा प्रतिष्ठानतर्फे गरजूंना भोजनदान

श्री साई सेवा प्रतिष्ठानतर्फे गरजूंना भोजनदान

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 26 ऑक्टोंबर

सामान्य लोकांप्रमाणे मालगुजारदारांची दिवाळी सुद्धा आनंदाने साजरी व्हावी या अनुषंगाने बाहेरगावून आलेले दिवाळीच्या वस्तूंची विक्री करणारे मालगुजार विक्रेते शहरातील गांधीचौक, जटपुरा गेट तसेच जुबिली शाळेजवळ आपल्या विक्रीला आणलेल्या सामान व परिवारासह काही दिवसांकरिता येथे उघड्यावर संसार थाटतात. त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी श्री साई सेवा प्रतिष्ठानतर्फे मदतीचा एक भाग म्हणून भोजनदान करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या दिवाळीला सुद्धा श्री साई सेवा प्रतिष्ठानतर्फे शहरातील सर्व मालगुजारांसाठी बुधवारी 26 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पूरी भाजी व गोड खाद्यपदार्थांची पाकीट वितरीत करण्यात आली. या उपक्रमाला प्रतिष्ठाणच्या सदस्यांमार्फत सदैव साई हीच मानवसेवा समजुन आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी सचिन गाटकिने, विनोद गोवारदिये, प्रमोद वरभे, कुनाल खनके, पंकज निमजे, भागवत खटी, सुरेश सातपुते, रूपेश महाडोळे, अनिल तपासे, दत्तात्रय सुळकंटीवार, प्रकाश नान आदींनी उपस्थित राहून सहकार्य केले.