माजरी कोळसा खाणींच्या परिसरात वाघाचा मुक्काम

50

माजरी कोळसा खाणींच्या परिसरात वाघाचा मुक्काम

माजरी कोळसा खाणींच्या परिसरात वाघाचा मुक्काम

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

माजरी : 28 ऑक्टोंबर
भद्रावती तालुक्यातील माजरी गावात वाघांची दहशत कायम आहे. सोमवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान एका कामगारावर वाघाने त्याच्या घराजवळच हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली होती. वाघाला वनविभागाकडून पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुच आहेत. गेल्या तीन दिवसांपासून माजरीत वाघाचा मुक्तसंचार असल्याने गावात दहशत पसरली आहे.

 

माजरी वेकोलिच्या अनेक मोकळ्या कोळसा खाणींमध्ये वाघाचा मुक्तसंचार असल्याने कामगारांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. माजरी, चारगाव, जुना कुनाडा, तेलवासा, ढोरवासा, एकतानगर, चड्डा कंपनीजवळील परिसरात अनेक दिवसांपासून वाघाचे सतत दर्शन होत आहे. या परिसरात वाघाचे वास्तव्य असून पोलिस विभाग आणि वनविभागाची त्यावर करडी नजर आहे. परिसरात वाघांची संख्या दोन असल्याची प्राथमिक माहिती आहे. वेकोलिच्या कोळसा खाणीतून निघणारे मातीचे ढिगारे या परिसरात आहे. या ठिकाणी झुडपी जंगल तयार झाले आहे. त्यामुळे जंगली हिंस्त्र प्राण्यांचा या परिसरात वावर वाढला आहे. माजरी परिसरात वाघाचा वावर असलेल्या परिसरात वनविभागाने कॅमेरे लावले आहे. तसेच गस्तही वाढविली आहे.