गुन्हेगाराला अटक करण्यासाठी संतप्त नागरिकांनी केले वाकोला पोलीस ठाण्यावर काढला मोर्चा

66

गुन्हेगाराला अटक करण्यासाठी संतप्त नागरिकांनी केले वाकोला पोलीस ठाण्यावर काढला मोर्चा
परिमंडळ ८ चे पोलीस उपयुक्त मंजुनाथ शिंगे यांनी तात्काळ कारवाईचे दिले आदेश

बौद्धाजन पंचायत समिती आणि जाती अंत संघर्ष समिती आणि विविध आंबेडकरी संघटनांनि केले आंदोलन


मुंबई, १२ डिसेंबर, प्रतिनिधी : मुंबईतील सांताक्रूझ पूर्व हनुमान टेकडी येथे राहणाऱ्या २१ वर्षाच्या आकाश जाधव या दलित समाजातील तरुणाचा याचा खून झाला. मात्र ८ दिवस उलटून गेले तरी जाधव हत्येतील प्रमूख आरोपींना अटक झाली नाही आणि अॅट्रासिटी गुन्हा दाखल झाला नाही म्हणून वांद्रे, खार सांताक्रूझ पार्ले भागातील संतप्त आंबेडकरी जनतेने शनिवारी वाकोला पोलीस ठाण्यावर निषेद मोर्चा काढला.संतप्त मोर्चाला सामोरे जात परिमंडळ ८ चे पोलीस उपयुक्त मंजुनाथ शिंगे यांनी आरोपीना तात्काळ अटक केली जाईल आणि इतर योग्ये ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मोर्चेकरांना दिले.

दलित तरुण आकाश जाधव हत्येतील प्रमूख आरोपींना त्वरीत अटक व अॅट्रासिटी गुन्हा दाखल करण्यासाठी आणि पोलिसांनी असहकार विरोधात बौद्धाजन पंचायत समिती आणि जाती अंत संघर्ष समिती आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने हा काढण्यात आला, असे कॉम्रेड सुबोध मोरे यांनी सांगितले. बौद्धाजन पंचायत समितीचे महासचिव लक्ष्मण भगत, गट प्रतिनिधी गणेश खैरे आणि जाती अंत संघर्ष समितीचे महाराष्ट्रचे प्रमुख कॉम्रेड सुबोध मोरे, कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. सारनाथ बुध्दविहार , हनुमान टेकडी ते वाकोला पोलीस ठाणे असा आक्रमक मोर्चा काढण्यात आला.

या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सामील झालेल्या महिलांनी खुन्यांना अटक करा, अट्रोसिटी गुन्हा दाखल करा. वाकोला पोलीस असहकार बदल जोरदार घोषणा दिल्या.यावेळी विविध आंबडेकर संघटना आणि पक्षांच्या नेत्यांनी मोर्चाला संबोधित केले.संघांनाच्या शिष्टमंडळाने तसेच परिमंडळ ८ चे पोलीस उपयुक्त मंजुनाथ शिंगे यांना मागण्यांचे निवेदन देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. गुहेगारांना ३०२ कलमाखाली अटक करण्यात येईल तसेच पीडित कुटुंबाला संवृक्षां देण्यात येईल तसेच इतर योग्य मागण्यांचा विचार केला जाही;ल असे आश्वसन परिमंडळ ८ चे पोलीस उपयुक्त मंजुनाथ शिंगे यांनी शिष्टमंडळाला दिले. सांघटनांच्या शिष्ठमंडळात बौद्धाजन पंचायत मितीचे महासचिव लक्ष्मण भगत, गट प्रतिनिधी गणेश खैरे आणि जाती अंत संघर्ष समितीचे महाराष्ट्रचे प्रमुख कॉम्रेड सुबोध मोरे, कॉम्रेड शैलेंद्र कांबळे, रिपाईचे तालुका अध्यक्ष, रघुनाथ कांबळे, वंचित बहुजन बहुजन पक्षाच्या महिला नेत्या प्रमिला मर्चंडे , मृत आकाशची आई सुप्रिया जाधव, बहिण अक्षता जाधव, भागुराम सकपाळ आदी सहभागाची होते. मोर्च्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

मृत आकाश जाधव यांच्या खुन्यांना आरोपींना ३०२ कलमाखाली पोलीस अटक करावी, अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करावा, पीडित कुटुंबांना तात्काळ ५० लाख रुपयांची मदत करावी, त्यांना रोजगार द्यावा. तसेच अनेक न्यायिक मागण्या शिष्टमंडळने निवेदन मार्फत परिमंडळ ८ चे पोलीस उपयुक्त मंजुनाथ शिंगे यांच्या कडे केल्या आहेत. शिंगे यांच्या अश्वशन नंतरआंदोलन मागे घेण्यात आले. आहे मात्र न्याय नाही मिळाला तर आनंद राज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठे आंदोलन केले असा इशारा भागात आणि मोरे यांनी दिला आहे.