इंदिरानगर स्मशानभूमी येथे मुलभुत सुविधा उपलब्ध करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी
• मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना निवेदन
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351
चंद्रपूर : 2 ऑक्टोंबर
शहरातील इंदिरा नगर येथील स्मशानभुमीची दुरावस्था झाली असुन येथे तात्काळ मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असुन या मागणीचे निवेदन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूर महानगर पालिका आयुक्त विपिन पालिवाल यांना देण्यात आले. मनपा हद्दीतील प्रभाग क्र. 3 मधील एम.ई.एल परीसरात असलेली स्मशानभूमी अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. इंदिरानगर, संजय नगर, क्रिष्णा नगर, श्याम नगर, राजीव गांधी नगर, नेहरूनगर, व बंगाली कॅम्प ह्या प्रचंड मोठया लोकसंख्येच्या परीसरात ही एकमात्र स्मशानभूमी असल्याने येथील नागरिक याच ठिकाणी अंतिम संस्कारासाठी येत असतात मात्र येथे पुरेशा मुलभुत सुविधा नसल्याने नागरीकांची प्रचंड गैरसोय होते. प्रेताला अग्नी देण्यासाठी असलेल्या चबुत्र्याच्या मध्यभागी मोठा खड्डा निर्माण झाल्याने त्या ठिकाणी प्रेताला अग्नी देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे या बाबीकडे गांभिर्याने लक्ष देत येथे बांधकाम करुन योग्य सोयी सुविधा पुरविण्याची मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असुन सदर मागणी लवकर मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशाराही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, रुपेश मुलकावार, महेश चहांदे, सिद्धार्थ मेश्राम, नितेश गवळे, रनजित मडावी, अतुल बोंढे आदींची उपस्थिती होती