जोगेश्वरीत दहा दिवसीय कोकणी – मालवणी जत्रौत्सवास प्रारंभ
पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं. ८१४९७३४३८
जोगेश्वरी :- जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात गेल्या ३० वर्षापासून अविरतपणे आयोजित करण्यात येणारी कोकणी मालवणी जत्रा ही आकर्षणाचे केंद्र असते. या जत्रेची जोगेश्वरीकर तसेच अन्य तालुक्यातील रहिवासी चातकाप्रमाणे वाट बघत असतात. आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या या जत्रेचे उदघाट्न जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
हा दहा दिवसीय जत्रौस्तव ४ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर असा असून या जत्रेत विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. यंदा जत्रेत सुमारे ७५ स्टॉल्स उभारण्यात आले असून यात अस्सल कोकणी मालवणी सुका मेवा, हाताने बनवलेले दागिने, कपडे, कोकणी व मालवणी तसेच अन्य खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांचा समावेश आहे. बच्चे मंडळींसाठी विविध प्रकारचे पाळणे, खेळणी असणार आहेत. जत्रेला येणाऱ्या हजारो जत्रेकरूसाठी खासकरून कोकणातून आलेली दशावतारी नाटकांचे खेळ दरदिवशी सायंकाळी ७ ते १० वाजेपर्येंत पार पडणार आहेत. एवढेच नव्हे तर बुवा सुजाता पाटणकर (डोंबिवली) व बुवा दर्शना म्हसकर (वांगणी) यांच्या भजनाची डबलबरी, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादममीतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकयात्रा या लोककलेच्या रंगतदार कार्यक्रमाचाही समावेश आहे.
शुक्रवारी या कोकणी मालवणी जत्रौत्सव उदघाटन प्रसंगी जोगेश्वरीतील आमदार रवींद्र वायकर यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक आणि जनता मोठ्याप्रमाणात उपस्थित होती.