ग्रंथालयाचे संगणकीकरण होणे गरजेचे
• एस. पी. महाविद्यालयातील राष्ट्रीय कार्यशाळेत वक्त्यांचा सूर
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351
चंद्रपूर, 2 नोव्हेंबर
आजचे युवक पुस्तकाऐवजी ‘ई-बुक्स’ वाचणे जास्त पसंद करतात. आगामी काळात अधिकाधिक ग्रंथालयाचे संगणकीकरण होणे आवश्यक असल्याचा सूर वक्त्यांच्या बोलण्यातून उमटला.
येथील सरदार पटेल महाविद्यालयातील ग्रंथालयशास्त्र विभागातर्फे भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय फाऊंडेशनच्या सहयोगातून दोन दिवसीय राष्ट्रीयस्तरावरील कार्यशाळा थाटात पार पडली. त्यावेळी ग्रंथालय शास्त्रातील अभ्यासक बोलत होते. काळाच्या बदलाप्रमाणे वाचनालयाचे आधुनिकीकरण करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘डिजिटलायझेशन’ प्रक्रियेतून सर्व ग्रंथालयांना जोडले गेल्यास तेथील उपलब्ध अध्ययन सामुग्रीचा लाभ सर्वांना मिळू व्यक्त केले. • शकेल, असे सांगत ही कार्यशाळा ग्रंथालय शास्त्राच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा आशावाद यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर होते. यावेळी गोंडवाना विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे माजी संचालक डॉ. श्रीराम रोकडे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष अनिल बोरगमवार, ग्रंथालयशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुधीर आष्टनकर, नागपूर विद्यापीठाचे डॉ. प्रिन्स आगाशे, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, कार्यशाळेचे समन्वयक ग्रंथालयशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एस. भुत्तमवार,.संगणकशास्त्र विभागप्रमुख एस. बी. किशोर उपस्थित होते.
यावेळी डॉ. काटकर यांनी, आजच्या माहिती व तंत्रज्ञान युगातील विद्यार्थ्यांना ग्रंथालयशास्त्र अभ्यासासोबतच संगणकशास्त्राचेही ज्ञान अवगत करणे गरजेचे असल्याचे मत संचालन प्रा. सुनील मुंजनकर यांनी, तर आभार डॉ. भुत्तमवार यांनी मानले. कार्यशाळेत देशभरातून सुमारे २०० प्रतिनिधी व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय शास्त्र विभागाच्या प्रा. शारदा पाचभाई, प्रा. ज्योती रोडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.