गोळेगणी-पैठण धरणाच्या कामाचा “शिवसेना पक्षप्रतोद आणि उपनेते कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले” यांच्या हस्ते शुभारंभ

सचिन पवार

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :-सदर धरणामुळे या भागातील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार धरणासाठी अधिग्रहण करण्यात येणाऱ्या जमिनीचा संबंधित शेतकऱ्यांवर अन्याय न होता योग्य तो मोबदला मिळणार कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी पैठण येथे ४७ कोटी ४० लक्ष रुपये खर्च करून पूर्ण होणाऱ्या धरणाच्या कामाचा आज दिनांक सहा रोजी मान्यवरांच्या आणि स्थानिक ग्रामस्थांच्या तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे संपर्कप्रमुख किशोर जाधव तालुकाप्रमुख निलेश अहिरे पोलादपूर शहर प्रमुख सुरेश पवार पोलादपूर नगर परिषदेचे नगरसेवक नागेश पवार सिद्धेश शेठ छोटू दीक्षित विभाग प्रमुख सतीश शिंदे लक्ष्मण मोरे ठेकेदार पाटील तसेच कार्यकारी अभियंता श्री साठे साहेब हे उपस्थित होते.

शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी गोळेगणी पैठण परसुले आणि विभागातील ग्रामस्थ सरपंच यांच्या उपस्थितीत सदर धरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला या धरणामुळे गोळेगणी पासून पोलादपूर पर्यंत नदीलगत असलेल्या गावांचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न तर मिटणार आहेच परंतु सदर धरणामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतात पीक घेण्यासाठी कायमस्वरूपी उपयोग होणार आहे सदर धरणासाठी वेळोवेळी संबंधित विभागाकडे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांनी पाठपुरावा केल्यामुळे या धरणाच्या कामाला आज मुहूर्त भेटले आहे 

सदर धरण हे दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचे संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांनी सूचित केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here