एकल अभियान अंचल आलापल्ली ने संभाग स्तर खेलकूद प्रतियोगिता मध्ये जिंकली एकूण 14 पदके

महेश बुरमवार

मुलचेरा तालुका प्रतिनिधी 

मो.न. 9579059379

 

एकल अभियान संभाग महाराष्ट्र अभ्युदय युथ क्लब च्या वतीने राज्य क्रिडा महोत्सव 5 व 6 नोव्हेंबर 2022 ला मानकापूर क्रीडा संकुल नागपूर येथे आयोजित केला होता..या स्पर्धेत एकल अभियान महाराष्ट्रातील दोन विभाग विदर्भ आणि नाशिक येथील 10 अंचल सहभागी झाले होते.. आदिवासी भागातील मुलांना एकल विद्यालयातून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.. तसेच शिक्षणासोबतच मुले खेळांमध्ये प्राविण्य मिळवले पाहिजे या हेतुने एकल ग्राम संघटन नागपूर च्या वतीने महाराष्ट्र स्तरिय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती..या स्पर्धेत कबड्डी, रनींग, लांब उड्डी,व उंच उड्डी अशा प्रकारे खेळ घेण्यात आले .

या स्पर्धेत 10 अंचल मधून जवळपास 300 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक अंचलातून प्राविण्य प्राप्त विद्यार्थी सहभागी झाले होते, यामध्ये आलापल्ली अंचल चे 17 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला , त्यापैकी 14 विद्यार्थी प्राविण्य मिळवले. 5 विद्यार्थी प्रथम क्रमांक, 4 विद्यार्थी द्वितीय क्रमांक,5 विद्यार्थी तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळविले.. आदिवासी क्षेत्रातील मुलांना एकल अभियान च्या माध्यमातून ही संधी मिळाली व मुलांनी या संधीचे सोने करत 5 गोल्ड मेडल,4 ब्राँझ मेडल,व 5 सिल्व्हर मेडल मिळविले.

 

आदिवासी मुलांनी एवढे मोठे यश मिळवत आलापल्ली अंचल चे नाव महाराष्ट्रात रोशन केले. या मुलांना येत पर्यंत पोहोचवण्यासाठी एकल अभियान आलापल्ली अंचल चे अंचल समिती यांनी मोलाचे सहकार्य केले . अंचल टिम, संच टिम व आचार्य यांनी खूप मेहनत घेतली यामुळे मुलांना यश मिळविता आले..   

आदिवासी भागातील मुलांनी मिळविलेल्या यशामुळे या भागातील लोक व एकल समिती खूप आनंदीत झाले आणि विद्यार्थी घरी आल्यावर त्यांचे स्वागत करून गावात मिरवणूक काढण्यात आली.. लहान लहान मुलांनी मिळविलेल्या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील आलापल्ली अतिदुर्गम भागातील आदिवासी भागातील मुलांनी मिळविलेल्या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here