मल्लेरा येथे तीन दिवसीय कबड्डी स्पर्धा संपन्न

48

मल्लेरा येथे तीन दिवसीय कबड्डी स्पर्धा संपन्न

मल्लेरा येथे तीन दिवसीय कबड्डी स्पर्धा संपन्न

मूलचेरा ता.प्रतिनिधी / महेश बुरमवार मो.न.9579059379

मुलचेरा : मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा येथे कार्तिकी पोर्णिमा निमित्य साधून हनुमान मंदिर मल्लेरा येथे गोपाळकाल्याचा व महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने बजरंग बली क्रीडा मंडळ च्या वतीने तीन दिवसीय 60 किलो वजनी पुरुष कबड्डी सामने घेण्यात आले .कबड्डी सामन्या करिता प्रथम बक्षीस सौ. भाग्यश्रीताई धर्मरावबाबा आत्राम (हलगेकर) माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली द्वितीय बक्षीस मा.उद्दिष्टीर विश्वास माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती गडचिरोली तृतीय बक्षीस म्हणून मा.मनोज भाऊ बंडावार उपसरपंच कोठारी तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मुलचेरा यांचे कडून देण्यात आले..
सदर स्पर्धेत १२ संघाने सहभाग दर्शविले त्यापैकी प्रथम क्रमांक पटकावलेले संघ चंदन खेडी क्रीडा मंडळ व द्वितीय क्रमांक बजरंग बली क्रीडा मंडळ मल्लेरा यांनी पटकावला. तृतीय बक्षीस यंग स्टार क्रीडा मंडळ मल्लेरा यांनी पटकावला. बक्षीस वितरणाकरिता उपस्थित मान्यवर माननीय अध्यक्ष उद्दिष्टीर जी विश्वास माजी बांधकाम सभापती परिषद गडचिरोली प्रमुख अतिथी म्हणून मा. मनोज भाऊ बंडावार उपसरपंच कोठारी तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मुलचेरा व मा.शंकर भाऊ मुत्येलवार सर प्रमुख पाहुणे म्हणून मा. सरपंच कडते साहेब, ग्रामपंचायत मल्लेरा उपसरपंच सौ .उज्वलाबाई मरापे ग्रामपंचायत मल्लेरा व तसेच प्रतिष्ठित नागरिक वसंत ईष्टाम ,किसन कोसनवार, आनंदराव बावणे ,सुनील तुनकलवार रमेश जी मुत्येलवार ,ईश्वर मडावी बाबुराव चौधरी उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मा.उद्दिष्टीर विश्वास यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले उत्कृष्ट प्रदर्शन करावे आपल्यामध्ये असलेले कला कौशल्य प्रदर्शन करावे.
बजरंग क्रीडा मंडळ सर्व सदस्य
मंडळाचे अध्यक्ष विनोद मुत्येलवार, उपाध्यक्ष राकेश मरापे ,सचिव विलास ईष्टाम ,संजय मरापे ,ईश्वर मडावी वसंत मरापे ,रमेश तेलचिरवार, नितेश बिट्टपलीवर, विकास दंडकेवार ,अनिल कोवे ,शामराव कोवे ,सर्व बजरंग बली क्रीडा मंडळ चे सर्व सदस्य यांनी नियोजन पद्धतीने आपापले काम पार पाडले.
कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन श्री. विनोद भाऊ मुत्येलवार यांनी केले व आभार नितेश भाऊ सिडाम यांनी मानले.