अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चार आरोपींची निर्दोष मुक्तता

50

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चार आरोपींची निर्दोष मुक्तता

संतोष मोरे 

इंदापूर विभाग प्रतिनिधी

मो: 7276143020

इंदापूर: भेंडी बाजार येथील जेजे रुग्णालय जवळ झालेल्या दुहेरी हत्या कांडा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन उर्फ नाना सह चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 

 सन.२०१० मध्ये छोटा शकील टोळीतील आसिफ दधी उर्फ छोटा मियाँ आणि शकील मोडक यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्या कांडाचा कट रचल्याचा आरोप छोटा राजन वर होता. या शिवाय मोहम्मद अली जॉन, प्रणय राणे, आणि उमेद यांना ही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. मात्र हा गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली.

तपासात पुराव्याअभावी ओळख परेड मध्ये अपयश आले. व वापरलेली हत्यारे आणि गोळ्या जुळत नसल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हे आरोपी बारा वर्षा पासून तुरुंगात आहेत. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी आज हा निर्णय दिला आहे.

फिर्याफी नुसार जेजे मार्ग पोलीस ठाण्याजवळ गोळीबार झाला. चार जनांनी ही घटना घडवली होती. अंदाधुंद होळीबारात आसिफ खान शिवाय आणखी तीन जन जखमी झाले आहेत.मात्र आसिफ खान कसा तरी जीव वाचवून घटना स्थळावरून निसटला.तर खान यांना भेटायला गेलेला. शकील मोडक आणि आसिफ कुरेशी यांचा जागीच मृत्यू झाला. शकील मोडक हा कॉंग्रेस नेते भाई जगताप यांचे स्वीय सचिव होते. तर कुरेशी हे मोडक यांचे मित्र होते.या अंदाधुंद गोळीबारानंतर छोटा राजन वर आरोप करण्यात आले.

आसिफ खान हा दाऊदच्या प्रतिस्पर्धी अंडरवर्ल्ड टोळीचा जवळचा सहकारी असल्याचे बोलले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अली जॉन मोहंमद शेख, आणि प्रणय मनोहर राणे यांना अटक केली होती. अधिक तपासात उमेद शेख, आणि अदनान सय्यद यांची नावे समोर आली असता, त्यांनाही अटक करण्यात आली. त्याचं वेळी एका मुलाखतीत छोटा राजनने आपली भूमिका कबुल केल्याचा दावा पोलिसांनी केला होता.